Foods in Winter Sakal
वुमेन्स-कॉर्नर

घरकुल अपुले : थंडीतील आहार

दिवाळी संपली, की थंडीची चाहूल लागते. सकाळी धुक्याची मऊशार दुलई लपेटलेली सृष्टी वेगळीच भासू लागते. कोवळ्या सूर्यकिरणांची उब हवीहवीशी वाटू लागते. ठिकठिकाणी रात्रीच्या शेकोट्या पेटू लागतात.

सकाळ वृत्तसेवा

दिवाळी संपली, की थंडीची चाहूल लागते. सकाळी धुक्याची मऊशार दुलई लपेटलेली सृष्टी वेगळीच भासू लागते. कोवळ्या सूर्यकिरणांची उब हवीहवीशी वाटू लागते. ठिकठिकाणी रात्रीच्या शेकोट्या पेटू लागतात.

- मीनल ठिपसे

दिवाळी संपली, की थंडीची चाहूल लागते. सकाळी धुक्याची मऊशार दुलई लपेटलेली सृष्टी वेगळीच भासू लागते. कोवळ्या सूर्यकिरणांची उब हवीहवीशी वाटू लागते. ठिकठिकाणी रात्रीच्या शेकोट्या पेटू लागतात. झाडांची पानगळती चालू झाली, तरी सृष्टी रंगांची उधळण करणं थांबवत नाही. हरतऱ्हेच्या रंगाच्या भाज्या, रसरशीत फळं यांची जणू मैफलच भरू लागते आणि मग खास हिवाळ्यातील खाद्यपदार्थांची एक खास यादीच तयार होते. खाण्याची आवड म्हणून आणि या ऋतूमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आजारी पडू नये म्हणून दोन्ही प्रकारच्या खाण्याच्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश असावा. कडाक्याच्या थंडीत तब्येत उत्तम ठेवण्यासाठी उष्ण गुणधर्माच्या पदार्थांचं सेवन अवश्य करावं.

मध अनेक पोषकतत्त्वं व नैसर्गिक गोडव्यानं परिपूर्ण असतं. मध शरीराला लवकर ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतं. मधात अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. मध घातलेला काढा घेणं थंडीच्या दिवसात अत्यंत लाभदायक. साजूक तुपाचा वापर चालू करावा. तूप शरीराचं तापमान नियंत्रित करण्यास मदत करतं. शरीराची झीज भरून काढण्यास तूप फायदेशीर ठरतं. साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी गूळ लाभदायी ठरतो. थंडीच्या दिवसांत शरीरातील रक्तप्रवाहाची गती मंदावते. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशा लोकांनी गुळाचं सेवन करावं. गुळाच्या सेवनानं पचनक्रियासुद्धा सुधारते. केशराचा सुगंध व स्वाद स्ट्रेसबस्टरचं काम करतं. मोहरी तेलाचा वापर करावा. मोहरीमध्ये ॲलिल आईसोथियोसाइनेट नामक घटक आढळतो- जे आपल्या शरीराचं तापमान योग्य पद्धतीनं वाढवतं. आलं फक्त चहाचा स्वाद वाढवण्यासाठीच उपयोगी नसून, इतर आजार दूर करण्यासाठी औषधी स्वरूपातदेखील वापरलं जातं. हिवाळ्यात तहान फार लागत नाही. पर्यायानं शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ही पातळी समतोल राखण्यासाठी या मोसमात संत्री, मोसंबी, अंजीर, चिक्कू या फळांचं सेवन करावं. याचबरोबर खजूर, तीळ, शेंगदाणे, गाजर यांचाही वापर करावा. अर्थात खजूर, गूळ, मध याचा वापर डायबेटिक लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा.

आता हिवाळा म्हटलं, की डोळ्यासमोर अनेक पदार्थ येतात. आलं किसून घातलेला वाफाळता चहा, वेलदोडा घातलेली कॉफी, गरमागरम साजूक तुपातला बेदाणे आणि काजू यांनी सजवलेला गाजर किंवा दुधी भोपळ्याचा हलवा, वेगवेगळ्या प्रकारचे साजूक तुपात केलेले पौष्टिक लाडू, करायला क्लिष्ट; पण चवीला तोड नसलेला, भरपूर साजूक तुपात केलेला मूग हलवा, कोजागिरी पोर्णिमेपासून बनवलं जाणारं मसाला दूध नंतरही थंडीत गप्पांच्या फडांची रंगत वाढवतं. चारोळ्या, वेलदोडा पूड, पिस्त्याचे काप, बदाम पूड, केशर आणि दूध याचा अफलातून मिलाप. थंडीतही आवडीनं आईस्क्रिम आणि कुल्फी याचा आस्वाद घेतला जातो. कधी कधी गरमागरम जिलेबी आणि गुलाबजामबरोबर आईस्क्रिम खाण्याची मजाच काही और असते.

बाजरीची मुगाची डाळ व इतर भाज्या घालून केलेली खुमासदार खिचडी, गुळाची खुशखुशीत पोळी, रंगबिरंगी सॅलड्स, तब्येतीस उत्तम अशी टोमॅटो, गाजर, बीटरूट, पालक, ब्रोकोली, लाल भोपळा, मटार या भाज्यांची सूप्स. अर्थात तब्येतीविषयी खूपच जागरूक असणाऱ्या लोकांनी काही सूप्समध्ये जिथे कॉर्नफ्लोअर किंवा मैदा वापरला जातो त्याऐवजी बटरवर किंचित भाजून घेतलेल्या गव्हाच्या पिठाचा वापर करावा. कढी भात, पिठलं भात, आमटी भात काही ठिकाणी आवडीनं रात्रीच्या जेवणात केला जातो. कधी भजी, कधी बारबेक्यू लावून वेगवेगळ्या भाज्या, पनीर यांचा आस्वाद घेतला जातो.

बऱ्याच ठिकाणी हिवाळ्यात खूप आवडीनं केला जाणारा पदार्थ म्हणजे उंधियो. लसूणपात, कोथिंबीर, ओला ताजा नारळ, लिंबू, मिरची याचं वाटण घालून तीळ, ओवा याच्या फोडणीत हळद, तिखट, गरम मसाला याबरोबर कच्चे केळे, रताळे, छोटे बटाटे, सुरण, छोटी वांगी, वालपापडी, सुरती पापडी, हरभरा, तुरीचे दाणे या सगळ्याची जास्त तेल घालून केलेली भाजी. अर्थातच वेळखाऊ; पण अतिशय चटपटीत आणि चविष्ट!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT