YIN Champion the change Sakal
वुमेन्स-कॉर्नर

महिलांनी आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत - यशोमती ठाकूर

समाजात सर्व स्तरांवर बदल होणे आवश्यक असून, महिलांनी स्वतः महिला असण्याचा गर्व बाळगला पाहिजे.

सकाळ वृत्तसेवा

समाजात सर्व स्तरांवर बदल होणे आवश्यक असून, महिलांनी स्वतः महिला असण्याचा गर्व बाळगला पाहिजे.

पुणे - समाजात सर्व स्तरांवर बदल (Changes) होणे आवश्यक असून, महिलांनी (Womens) स्वतः महिला असण्याचा गर्व बाळगला पाहिजे. आज ग्रामीण भागात महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधी (Leader) म्हणून काम करताना दिसत आहेत. स्त्री - पुरुष समानतेसाठी तसेच, सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन, प्रयत्न करणे आवश्यक आहेत. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, महिला आपल्या कल्पना, स्वप्ने, व ध्येय आत्मविश्वासपूर्वक सत्यात आणू शकतात, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहेत. असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त टाटा प्ले बिंज प्रस्तुत यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) 'चॅम्पियन द चेंज - संवाद महिलांचा, महिलांसाठी' ही दोन दिवसीय ऑनलाइन मोफत मार्गदर्शन कार्यशाळा, फाईन ज्वेलरी क्षेत्रातील जोस आलुक्कास, वूट, व हॅवेल्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसातील प्रमुख मार्गदर्शकांचे मनोगते :-

शिवाली देशपांडे - माजी फ्लाइट लेफ्टनंट :- आपला देश व देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा म्हणून आपले सैनिक रात्रंदिवस सीमेवर देशाचे रक्षण करत असतात. कोणत्याही माध्यमातून देशाची सेवा करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य व जबाबदारी आहे. प्रत्येक महिलेचे आयुष्य हे एका सैनिकाप्रमाणे असून, महिलांनी समाजात वावरत असताना प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक स्तरावर झुंझ देऊन, यश प्राप्त करावे. महिला आता देशसेवेसाठी एनडीए मध्ये प्रशिक्षण घेऊन, देशसेवेसाठी योगदान देऊ शकतात. मोठ्या प्रमाणात मुलींनी देशसेवेसाठी निर्भयतेने पुढे येणे आवश्यक आहे.

देवयानी वैश्यम्पायन - मुख्य कार्यकारी अधिकारी - एचआर टेक :- बदलत्या काळानुसार सर्व क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. मागील काळात ८० ते ९० टक्के लोक पूर्ण वेळ काम करत होते. आज ५० ते ७० टक्के लोक पूर्ण वेळ काम करतात. पुढील काही काळात ३० टक्केच लोक पूर्ण वेळ काम करतील. बहुसंख्य लोकांची जागा आधुनिक तंत्रज्ञान युक्त मशिन्स घेतील. पुढील काळात कार्यलयांची रचना, कामाच्या वेळा यांचे स्वरूप बदलेल. तसेच आधुनिक तंत्रज्ञान युक्त कुशल मनुष्यबळाची जगभरात मागणी वाढेल. तरुणींसाठी कोर्पोरेट्स मध्ये विविध संधी आहेत. यासाठी महाविद्यालयीन स्तरावर तरुणींनी माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, टेक्नॉलॉजी, प्रोग्रॅमिंग व डिजिटली सॉफ्ट स्किल्स संबंधित प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

तृषाली वाघमारे - फदाळे - मुख्य कार्यकारी अधिकारी - अविका एंटरटेनमेंट :- आज अभिनय, मनोरंजन, कला व फॅशन - ब्युटी शो क्षेत्रात मॉडेलिंग हा तरुण वर्गांसाठी चांगला पर्याय ठरत आहे. वस्तू व सेवांच्या क्षेत्रातील कंपन्यांना जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या वस्तू व सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवाव्या लागतात. त्याकरीता मॉडेल्स यांची आवश्यकता असते. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील तरुणींना मॉडेलिंग क्षेत्रात करिअरची संधी आहे. त्यासाठी आत्मविश्वासाने हे क्षेत्र निवडण्याचे व त्यादृष्टीने प्रशिक्षण घेण्याची तरुणींनी तयारी ठेवावी. त्याचबरोबर अभिनय, मनोरंजन, कला, फॅशन - ब्युटी शो व मॉडेलिंग या क्षेत्रातील योग्य प्रशिक्षण घेऊन, अभिनय व मॉडेलिंग विषयी प्रशिक्षण देणारी स्कूल सुरु करून, आपण नवोदितांना प्रशिक्षण देऊ शकता.

भारती इदाटे - संचालक - सॅनिट्री नॅपकिन केअर टेकर :- आज भारतात मुलींच्या मासिक पाळी व एकूणच आरोग्याविषयी शालेय स्तरापासूनच प्रशिक्षणाचे व जनजागृतीचे कार्यक्रम राबविले जात आहेत. महिलांच्या आरोग्याबाबत सॅनिटरी नॅपकिन्स एक क्रांती आहे. महिलांनी न लाजता अशा व्यवसायात पाऊल टाकणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात देखील सॅनिटरी नॅपकिन्स निर्मिती व विक्री या व्यवसायात मोठ्या प्रमाण संधी आहेत.

महिलांनी आपली बंधने झुगारून पुढे पाऊल टाकणे आवश्यक आहे. तसेच समाजाच्या विकासासाठी समाजातील दुर्लक्षित घटकांना आपल्या सोबत घेऊन, मार्गक्रम करणे आवश्यक आहे. तरच समाजाचा सर्वांगीण विकास होईल. आपल्या कुटुंबातील रक्ताचे नाते असलेल्या सदस्यांसोबतच समाजातील दुर्लक्षित घटकांशी सुद्धा आपले रक्ताचे नाते निर्माण करून, त्यांना मदत करावी आणि आपल्यासोबत पुढे न्यावे. असे एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यास संस्थेच्या प्रमुख रेणुताई गावस्कर यांनी मार्गदर्शन केले.

देशाचे भविष्य म्हणजे लहान मुले आहेत. समाजातील स्थलांतरीत कुटुंबातील, वस्ती पातळीवरील कमी - उत्पन्न गटातील आणि निराधार व निराश्रित मुलांच्या शिक्षणासाठी व काळाची गरज ओळखून कौशल्याधिष्टित प्रशिक्षणासाठी सर्वानी एकत्र येऊन, काम करणे आवश्यक आहे. शिक्षणानेच संस्कार होतात व एक सुजाण नागरिक होण्यास मदत होते. सुजाण नागरिकांचा एक सुदृढ समाज निर्माण होतो. त्याचबरोबर लैंगिक समानता विषयी जनजागृतीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत. असे डोर स्टेप स्कूल संस्थेच्या प्रमुख रजनी परांजपे यांनी मार्गदर्शन केले.

समाजात प्रामुख्याने वयो - वृद्धांना कुटुंबियांकडून , नातलगांकडून नाकारले जाते. वृद्ध व्यक्ती सुद्धा समाजातील मुख्य घटक असून, त्यांच्या उर्वरित निरोगी व सुखकारक आयुष्यासाठी समाजाकडून व संस्थांकडून सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच , आजच्या तरुण पिढीने आपल्या जन्मदात्यांना त्यांच्या वृद्धपकाळात एकटे सोडू नये , तर त्यांचा आधार होणे गरजेचे आहे. असे आधार विश्वस्त संस्थेच्या प्रमुख डॉ. नंदा शिवगुंडे यांनी मार्गदर्शन केले.

स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये जनसेवा फाउंडेशनच्या विश्वस्त मीना शहा यांनी चर्चा घडवून आणली.

'मला गारमेंट्स व्यवसायासाठी व कारखान्यासाठी जागा न मिळाल्याने मी, हा व्यवसाय घरून सुरु केला. तसेच, व्यवसायात अनेक वेळा आलेल्या चढ - उतारांमुळे व लॉकडाऊन मुळे झालेल्या नुकसानीमुळे हार न मानता मी, व्यवसाय सुरु ठेवला. तसेच, गारमेंट्सच्या कारखान्यात स्थानिक महिलांना प्रशिक्षण देऊन, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. महिलांनी जर ठरविले तर महिला काहीही करू शकतात. आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही. मोठ्या शहरातच व्यवसाय करता येतो असे नाही, ग्रामीण भागात सुद्धा महिलांना विविध क्षेत्रातील व्यवसायासाठी सामान संधी आहेत. शासनाच्या अनेक योजना महिलांसाठी उपल्बध असून, अशा योजनांचा महिलांनी लाभ घेऊन, व्यवसायात पदार्पण करावे'.

- पुर्णिमा भामकर, संचालक - उद्यान सिग्नेचर प्रायव्हेट लिमिटेड,

'जगभरात फिरताना भारतीय व महाराष्ट्रीयन शाकाहारी खाद्यपदार्थ मला कमी प्रमाणात आढळून आले. लहान मुलांसाठी, गरोदर महिलांसाठी व इतरांसाठी कोणते-कोणते भारतीय खाद्यपदार्थ आहेत, यांची माहिती सर्वप्रथम घेऊन, भारतीय व महाराष्ट्रीयन शाकाहारी खाद्यपदार्थ जगभर पोहोचविण्यासाठी व भारतीय खाद्यपदार्थांचे महत्व समोर आणण्यासाठी मी, पूर्णब्रम्हा रेस्टोरेंट सुरु केले. पण हे करत असताना भारतीय संस्कृती सुद्धा जगभर पोहोचविली. महिलांनी कोणत्याही क्षेत्रातील व्यवसाय सुरु करताना व्यवसायानुसार आपली संस्कृती, परंपरा, आपला पारंपरिक पेहराव अंगीकारून वाटचाल करून, आपल्या व्यवसायाचा व संस्कृतीचा ठसा उमटवावा'.

- जयंती कठाळे, संचालक - पूर्णब्रम्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT