स्वप्नं कुणीही बघू शकतं. जे स्वप्नं बघतात, तेच ती साकारही करू शकतात. मात्र, स्वप्नं फक्त बघून चालत नाहीत, त्यांचा पाठपुरावा करावा लागतो. जो आपल्या स्वप्नांचा असा पाठपुरावा करू शकतो, तोच पुढे जाऊ शकतो. स्वानंद हे असंच नाव. त्याला निवेदक बनायचं होतं. कॉलेजमध्ये छोट्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करायचा, वेगवेगळ्या स्पर्धांत भाग घ्यायचा. मात्र, कोरोनाचं संकट आलं आणि सगळंच थांबलं. कोणत्याही कलेला रियाजही तितकाच महत्त्वाचा असतो. सगळे कार्यक्रम बंद झाले, मित्रमंडळींचं एकत्र येणं बंद झालं आणि स्वानंद खट्टू झाला. मात्र, जे मनापासून स्वप्नं बघतात त्यांनाच त्यांच्या पूर्तीचा मार्गही सापडतो. स्वानंदला मार्ग सापडला झूम कार्यक्रमांचा. स्वानंदनं काही कलाकार मित्र-मैत्रिणींना गोळा केलं आणि झूमवरच छान कार्यक्रम तयार केला. थोडी गाणी, थोडं वाचन, थोडं निवेदन असा छान कार्यक्रम. सुरवातीच्या काही कार्यक्रमांत अनेक अडचणी आल्या. नेटवर्कच्या समस्येपासून अगदी कलाकारांच्या समन्वयापर्यंत. मात्र, हळूहळू छान जमत गेलं आणि एक अगदी प्रोफेशनल दर्जाचा कार्यक्रम तयार झाला. काही कार्यक्रम मुलांनी फ्री केले; परंतु हळूहळू तिकीट ठेवायला सुरुवात केली आणि त्यालाही प्रतिसाद मिळायला लागला.... स्वानंद आता झूमवरचा स्टार निवेदक बनलाय!
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गायत्री आर्टिस्टिक पर्स तयार करायची. कधी एखाद्या मैत्रिणीला तयार करून द्यायची, कधी नात्यातल्या कुणाला द्यायची. तिनं तयार केलेल्या अशा वस्तूंचं छान प्रदर्शन भरवायचं असंही तिनं ठरवलं होतं. मात्र, लॉकडाउननं तिच्याही उत्साहावर पाणी फिरवलं. मात्र, गायत्रीनं उलट मिळालेल्या वेळेचा चांगला फायदा करून घेतला. कापडापासून इतर मटेरिअलपर्यंत अनेक गोष्टी वापरून तिनं कितीतरी पर्स आणि इतर आर्टिस्टिक मटेरिअल तयार केलं. तिनं फेसबुकवर त्याचे फोटोही टाकायला सुरुवात केली. त्यातून तिला प्रतिसाद मिळत गेला आणि लोक त्या गोष्टी विकत मागायला लागले. आता गायत्री छानपैकी कलेची वेगवेगळी रूपं दाखवते आहे. कॉलेजमध्ये असतानाच ती चक्क छोटी उद्योजिकाही बनली.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्वानंद, गायत्री ही केवळ काही उदाहरणं झाली. स्वतःचं ऑडिओ पॉडकास्ट सुरू करणारी नेहा, गणेशमूर्ती ऑनलाइन विकणारा प्रथमेश, स्वतःच्या लेखांचं ई-बुक तयार करणारा संग्राम अशी किती तरी उदाहरणं सांगता येतील. अशी उदाहरणं तुमच्याही आजूबाजूला दिसतील. मोठं होण्याची खूप स्वप्नं बघतात ही मंडळी; पण ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठीही ती तितकीच झटतात. आता तर तुमच्याकडे तंत्रज्ञान अगदीच हाताशी आहे. त्यातून स्वप्नं पूर्ण करण्याचे मार्गही खूप सोपे झालेत. फक्त त्यासाठी लागणारी ‘पॅशन’ आणि ‘डेडिकेशन’ या गोष्टी असल्या म्हणजे झालं. या दोन गोष्टी असल्या, की मग लॉकडाउन असो किंवा इतर काही असो-कोणतेही अडथळे तुमची वाटचाल रोखू शकत नाहीत. उलट अडथळे जितके येतात, तितकेच नवनवे मार्गही जास्त दिसायला लागतात. स्वानंदसारख्या मंडळींनी संकटांनाच संधी बनवलं आणि आता तर हे काम त्याच्यासाठी खूपच सोपं झालं. सो फ्रेंड्स, मथितार्थ इतकाच, की स्वप्नं बघा. कोणत्याही मर्यादा न मानता बघा. या स्वप्नांना पॅशनचे पंख द्या आणि पाठपुराव्याची जोड द्या. मग बघा, यश तुमच्याच हाती असेल...
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.