BS6-Bikes 
युथ्स-कॉर्नर

झूम... : ‘बीएस-६' बाईक्‍स

चंद्रकांत दडस

देशात एप्रिल महिन्यापासून ‘बीएस-६’ उत्सर्जन मानक लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहक ‘बीएस-४’ इंजिन वाहनांऐवजी ‘बीएस-६’ मानकांचे इंजिन असलेले वाहन वापरण्यास सुरुवात करत आहेत. या नव्या बीएस-६ मानकांच्या वाहनांमध्ये मायलेज आणि इंजिनामध्ये अधिक ताकद पाहायला मिळत आहे. आपणही किफायतशीर ‘बीएस-६’ बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर खालील काही पर्यायांचा आपण विचार करू शकता. या बाईक्‍सची किंमतही ७० हजार रुपयांच्या आत आणि मायलेजही सर्वाधिक आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिरो स्प्लेंडर -
ग्राहकांची ही अनेकांची आतापर्यंतची आवडती बाईक ठरली आहे. एकदा खरेदी केल्यानंतर सर्व्हिसिंग आणि योग्य काळजी घेतली की, पुढील १० ते १२ वर्षे अगदी कसलाही त्रास न देता विविध ठिकाणी ती आपला प्रवास सुखकर करते. या बाईकला कंपनीने नुकतेच ‘बीएस-६’ इंजिनसह अपडेट करत बाजारात दाखल केले आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत ५९ हजार ६०० रुपये आहे. हिरो स्प्लेंडर प्लस ‘बीएस-६’मध्ये कंपनीने १०० सीसी क्षमता असलेल्या इंजिनचा प्रयोग केला आहे. ते ७.९१ बीएचपीची ताकद आणि ८.०५ एनएमचा टॉर्क निर्माण करते.

हिरो एचएफ डिलक्‍स -
या बाईकलाही कंपनीने नवीन मानकांनुसार अपडेट केले आहे. तिची सुरुवातीची किंमत ५५ हजार ९२५ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. एचएफ डिलक्‍स कंपनीने १०० सीसी क्षमता असलेल्या इंजिनचा प्रयोग केला आहे. हे इंजिन ८ पीएसची ताकद आणि ८.०५ एनएमचा टॉर्क निर्माण करते.

होंडा शाईन - 
जपानची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या होंडाने भारतीय बाजारात शाईनला बीएस-६ मानकांच्या इंजिनसह सादर केले आहे. कंपनीने या नवीन बाईकची सुरुवातीची किंमत ६७ हजार ८५७ रुपये इतकी ठेवली आहे. नवीन होंडा शाईन मागील मॉडेलच्या तुलनेत १४ टक्‍के अधिक मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. यासह कंपनीने या बाईकमध्ये ५ स्पीड गिअर बॉक्‍स देण्यात आले आहेत. बीएस-४ इंजिन असलेल्या यापूर्वीच्या मॉडेलमध्ये ४ स्पीड गिअर बॉक्‍स देण्यात आले होते.

बजाज पल्सर - 
बजाज ऑटोची लोकप्रिय बाईक बजाज पल्सर अनेक तरुणांची आवडती आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत ६४ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. पल्सर १२५मध्ये कंपनीने १२४.३८ सीसीच्या क्षमतेचे सिंगल सिलिंडर असलेल्या टू व्हॉल्व्ह एअर कूल्ड इंजिनचा प्रयोग केलेला आहे. हे इंजिन १२ एचपीची ऊर्जा आणि ११ एनएमचा टॉर्क निर्माण करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT