रोड सेफ्टी जनजागृती कार्यक्रम संत तुकाराम नगर मधील डॉ. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडला 
युथ्स-कॉर्नर

दंडापेक्षा जिवाची काळजी म्हणून वाहतूक नियम पाळा - आदित्य जाधव

टीम YIN युवा

पिंपरी चिंचवड, ता. ९ : सकाळ माध्यम समूहाच्या यिन व्यासपीठाच्या वतीने रोड सेफ्टी जनजागृती कार्यक्रम संत तुकाराम नगर मधील डॉ. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड चे आर.टी.ओ निरीक्षक आदित्य जाधव प्रमुख उपस्थित होते. यासोबत आर.टी.ओ सहाय्यक निरीक्षक सोनाली चौधर, आरटीओ सहाय्यक निरीक्षक सुनील गवळी, यिन चे राज्य सहाय्यक व्यवस्थापक अनिकेत मोरे यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी. वाहतुकीचे नियम दंडापेक्षा स्वतःच्या जीवासाठी किती महत्त्वाचे आहेत, हे विद्यार्थ्यांना पटवून सांगण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी आदित्य जाधव म्हणाले, कोणतेही दुचाकी वाहन हातात घेताना त्याचा ब्रेक, इंडिकेटर, चाकातील हवा प्रथम तपासून घ्यावी. आय.एस् ४१५१ प्रमाणित हेल्मेट वापरावे. सीट बेल्ट आणि रोड मार्किंग चा वापर करावा, रस्त्याच्या कडेला माहिती देणारी आणि सावधान करणारी अशी वेगवेगळी चिन्हे असतात त्याचा अर्थ समजून घ्यावा. त्याचे पालन करावे. रोडवर चालताना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरून येणारी वाहने दिसतात. या प्रकारे सखोल माहिती पी.पी.टी. दाखवत विद्यार्थ्यांना देण्यात आली. संस्थेचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांनी 'यिन'च्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. लालितकुमार वाढवा यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. मंगेश काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अनुप्रिया कुंभार यांनी केले. तर आभार दुर्वांकुर गोडसे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT