मुंबई (प्रतिनिधी)
चांगल्या कामाला पाठबळ दिल्याशिवाय ते उभे राहत नाही. त्यामुळे १८ वर्ष वयाच्या पुढील अनाथ मुलांसाठी तर्पण संस्थेने जे काम हाती घेतले आहे त्याला महाराष्ट्र शासनाने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असून कोणी काहीही म्हणाले तरी मी स्वतः या कामात तर्पणच्या पाठीशी उभा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जो समाज आणि देशासाठी काम करतो त्यांच्या पाठीशी भगवानगडाचे आशिर्वाद कायम असतात.
संत ज्ञानेश्वर माऊलींनी जे कार्य हाती घेतले होते तेच कार्य आज श्रीकांत भारतीय पुढे घेवून जात आहेत असे उद्गार न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी काढले. मुंबईच्या गरवारे क्लब हाऊस मध्ये युवा तर्पण पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचीही विशेष उपस्थिती होरे.नवनाथ महाराज निम्हण आणि मयुरी सुषमा या दोघांना युवा तर्पण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रास्ताविक करताना तर्पणचे कार्यकारी संचालक आ. श्रीकांत भारतीय म्हणाले की, १८ वर्ष वयाच्या पुढील अनाथ मुलां-मुलींसाठी केवळ जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करुन थांबता येणार नाही तर त्यांच्याशी भावनिक नाते जोडण्याचे काम समाजाला करावे लागेल.
हे काम करण्यासाठी तर्पण फाऊंडेशनने एक पाऊल पुढे टाकले आहे. हे ईश्वरीय कार्य असल्यामुळे ज्या प्रमाणे संत नामदेव महाराजांनी आपल्या हरीच्या दासांसाठी आकल्प आणि अहंकारमुक्त आयुष्य मागितले तीच मागणी आज आम्ही अनाथांचे दास महंत नामदेव शास्त्रींच्या समोर मागत आहोत असे आ.
भारतीय म्हणाले. या प्रसंगी बोलतांना श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले की, आई-वडिल असतानाही अनाथ झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा अद्भुत ग्रंथ निर्माण करुन ते विश्वाची माऊली झाले.
त्याच कार्याचा वारसा आज तर्पण संस्थेच्या माध्यमातून पुढे चालवला जात आहे. ज्या व्यक्ती आणि संस्था समाज, धर्म आणि देशासाठी काम करतात त्यांच्या पाठीशी परमेश्वराचे आशिर्वाद असतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या आदर्श तत्वाचे उदाहरण असून आम्ही भगवानगडाच्या माध्यमातून ज्या व्यक्ती ब्रह्मचारी राहून ज्ञानेश्वरीचे अध्ययन करतात त्यांच्यासाठी कायम स्वरुपी निवास आणि भोजन व्यवस्था केली आहे.
अनाथ मुलांना समाजाने बळ दिल्यास त्यांच्यातील सामर्थ्य देशकार्यासाठी उपयोगी पडते. हे काम आ. श्रीकांत भारतीय करतात
फडणवीसांकडून नामदेवशास्त्रींचे गुणगान
श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या विषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले. विदान आणि संत साहित्याचे अभ्यासक असलेल्या न्यायाचायांची प्रदिपं तपस्या असून त्यांनी भगवानगडाचे महत्व वाढवण्याचे काम केले.
समाज गडाच्या पाठीशी आहे. सरकार म्हणून आम्ही सुध्दा गडाच्या विकासासाठी पुढाकार घेणार आहोत. मधल्या काळात सरकार बदलल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या असेही फडणवीस म्हणाले.
आ. श्रीकांत भारतीय यांनी डॉ. नामदेव शास्त्री हे सिध्द पुरुष असल्याचे सांगितले. त्यांच्या दर्शनाने आणि सत्संगाने जीवन धन्य झाल्याचेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गडाच्या विकासासाठी ६ कोटी रु. दिले होते. याची आठवण करून देत नामदेव शास्त्रींनी कृतज्ञता व्यक्त केली.
भारतीय करत असल्यामुळे समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.नामदेव शास्त्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी आ. श्रीकांत भारतीय यांच्या कार्याचा गौरवपुर्ण उल्लेख करताना सांगितले की, त्यांच्याकडे सकारात्मक कार्य करण्याची खुप मोठी ऊर्जा असून त्यांचे संपुर्ण कुटुंब अनाथांसाठी समर्पित भावनेतून काम करत आहे.
या क्षेत्रात सरकारी यंत्रणा जरी काही प्रमाणात काम करत असली तरी जो पर्यंत स्वयं प्रेरणेतून काम करणाऱ्या तर्पण सारख्या संस्था पुढे येत नाहीत तो पर्यंत अनाथांना खरा नाथ मिळणार नाही. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला आहे.
आम्ही अनाथांना १ टक्के आरक्षण देवून हाच समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. ही एक सुरुवात असून येणाऱ्या काळात या निर्णयामध्ये आवश्यकतेनुसार आम्ही बदल करणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकारने आता या कामासाठी तर्पण सोबत करार केला असून आम्ही कुठल्याही परिस्थितीत तर्पणच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज पांचाळ यांनी तर आभार प्रदर्शन गगन महोत्रा यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.