youth motivation 
युथ्स-कॉर्नर

तरुणाईच्या ऊर्जेला विधायक दिशा : 'यिन'च्या विद्यार्थ्यांचे राज्यभर कौतुक

टीम YIN युवा

भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. कारण आपली बहुतांश लोकसंख्या सक्रिय, कार्यशील आहे आणि ती तरुण आहे. तरुण म्हणजे ऊर्जेचे भांडार. तरुणांमध्ये परिवर्तनाची अफाट ऊर्जा आहे.

या उर्जेला विधायक दिशा देण्याचे काम व्हायला हवे. कारण युवा पिढी ही आपल्या देशाचे भविष्य आहे. तरुणांच्या उर्जेला-संकल्पनाना पाठिंबा देत त्यांच्यातील क्रियाशीलतेला- सर्जनशीलतेला वाव देऊन त्यांना एक सामाजिक व्यासपीठ मिळावे आणि तरुणांनी समाज- राष्ट्राच्या जडणघडणीत आपले योगदान द्यावे, या व्यापक दृष्टिकोनातून सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मा. अभिजीत पवार सरांनी 'यिन' ची संकलपना मांडली. ‘यिन'च्या माध्यमातून तरुणाईचे संघटन करताना जाणवले कि आजची युवा पिढी प्रॅक्टीकाल ॲप्रोच ठेवते आणि या पिढीला कन्विन्स करणे खूप कठीण गोष्ट आहे. पण ‘यिन'च्या तरुणाईसोबत काम करताना जाणवले कि एखादी गोष्ट पटली तर ती पूर्ण करण्यासाठी हीच तरुणाई कोणतीही कसर ठेवत नाही. जीव ओतून त्यात काम करणार आणि त्याच तरुणाईला वैयक्तिक -व्यावसायिक आणि सामाजिक विकासाच्या एका समान उद्दिष्टाने ‘यिन'ने एका सामाजिक व्यासपीठावर गुंफले आहे. गेली नऊ वर्षे ‘यिन' अविरतपणे या तरुणांसोबत काम करीत आहे. ज्यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. ज्याला तरुणाईने उस्फुर्त प्रतिसाद दिला आणि त्यांच्या भक्कम पाठिंब्यावर आज ‘यिन' दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे.

‘यिन'ने गेल्या नऊ वर्षात अनेक सामाजिक , शैक्षणिक, व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवले. ज्यातून समाजासाठी, देशासाठी काही तरी करू इच्छिणाऱ्या तरुणांचे संघटन झाले. आपल्या देशात अनेक संघटना, राजकीय पक्ष, संस्था आहेत. पण त्यात प्रत्येकाचा काही काही ना काही अजेंडा असतो. अशावेळी अशा एका व्यासपीठाची गरज होती, जिथे तरुणांच्या संकल्पनांना विचारांना वाव मिळेल. प्रसिद्धी मिळेल. तसेच जिथे सर्व युवक एकत्र येतील आपल्या वैयक्तिक, व्यावसायिक - सामाजिक प्रगतीचा, भल्याचा विचारमंथन करतील आणि त्या त्यांना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी काम करतील. ती गरज ‘यिन' ने पूर्ण केली आणि म्हणूनच ‘यिन' ला तरुणांचा प्रतिसाद मिळाला आणि वाढतोच आहे.

‘यिन' च्या या अभिनव संक्लपनेला तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. युवा पिढी आणि देश-समाज यांच्यातील दुवा म्हणून ‘यिन' व्यसपीठ काम करीत आहे. ‘यिन'च्या माध्यमातून आज तरुणांमध्ये सकारात्मक बदल घडत आहेत. ‘यिन'च्या विविध उपक्रमातून त्यांना मार्गदर्शन मिळत आहे. यिन संवाद, यिन समर युथ समिट, सेलिब्रेटिंशी गप्पा, क्षेत्रभेटी आदी उपक्रमातून त्यांना समाजातील दिग्ग्ज यशस्वी व्यक्तिमत्वांसोबत संवाद साधता आला. ज्यातून त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले.‘यिन' ची ही तरुणाई आज स्वतःसाठी काम करताना समाजासाठी पण झटते आहे. माझी शाळा, माझे उपक्रम, स्वच्छता मोहीम, दिवाळी फराळ वाटप असो किंवा थंडीच्या दिवसात रस्त्यावरील निराधारांना चादर वाटप, अनाथाश्रमातील मुलांसोबात दिवाळी, रक्षाबंधनसारखे उत्सव असो यानिमित्ताने ही तरुणाई आपला आनंद समाजातील घटकांसोबत वाटत आहे. यानिमित्ताने आपल्यातील संवेदनशीलता ही तरुणाई जपत आहे.

त्यातील विशेषःत्वाने उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे कोरोना काळात याच तरुणाईने राज्यभर कोविड योद्धा म्हणून बजावलेली कामगिरी. राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘यिन'च्या तरुणाईने लोकांना दिलासा देण्यासाठी, मदत करण्यासाठी शंभर युवकांची टीम तयार केली होती. ज्यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांना प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन मदत केली.

कोणी बेड उपलब्ध करून दिले. कोणी जेवणाचे डबे दिले. कोणी लसीकरण केंद्रावर काम केले तर कोणी रक्तदान केले. त्यातही उल्लेखनीय बाब म्हणजे सोलापूरच्या प्रशांत माळी या ‘यिन'च्या कोविड योध्याने स्वखर्चाने २४ तास रुग्णवाहिका उपलबध करून दिली होती. आमच्या या कोविड योध्यांनी केवळ राज्यातच नाही तर देशभर मदतकार्य केले.

‘यिन'च्या आजपर्यंतच्या उपक्रमातील अविस्मरणीय कार्य होते हे ! ज्याचे राज्यभर कौतुक झाले. त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यानी त्याचे कौतुक केले. तरुणांवर विश्वास ठेवून त्यांना पाठबळ दिले तर त्यांच्या हातून सर्जनात्मक कार्य उभे राहू शकते, बदल घडू शकतो, याचा प्रत्यय ‘यिन'मुळे वारंवार येतो.

‘यिन'च्या तरुणांवर आज समाज शिक्षणव्यवस्थेतील धुरीणांचा दृढ विश्वास निर्माण झाला आहे. हाच विश्वास सार्थ ठरवत ‘यिन' च्या तरुणांईने लोकांसाठी काम केले आहे. पोलीस मित्र उपक्रम, निर्माल्य संकलन, रक्तदान शिबीर आदी उपक्रमांद्वारे ‘यिन' ने लोकांसाठी काम केले.

‘यिन' अधिकारी म्हणून तरुणांसोबत काम करताना आज आम्हाला एक वेगळेच समाधान, आनंद आहे. आपण गुरु, शिक्षक, प्राध्यापक नाही पण समाजातील महत्वाच्या घटकाला दिशा देण्याच्या खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली, याचा अभिमान व गौरव वाटतो. ‘यिन'ची संकल्पना मांडून वास्तवात उतरवणाऱ्या मा.अभिजीत पवार सरांच्या विधायक कार्यात सहभागी होण्याची गौरवपूर्ण संधी मिळाली. हे माझे भाग्य समजतो.

- अवधूत गायकवाड, यिन सहायक व्यवस्थापक, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT