Hitech Cycle Sakal
युथ्स-कॉर्नर

झूम : नव्या जमान्याच्या ‘हायटेक’ सायकल ...!

बहुतेकांच्या आयुष्याची सुरुवात लहानपणी तीनचाकी सायकलने झाली. जस जसे मोठे होत गेलो, तसे दोनचाकी सायकलशी आपला परिचय झाला.

प्रणीत पवार

लहानपणापासून प्रत्येकाचे सायकलशी नाते जोडले गेलेले आहे. अलीकडील काही वर्षांत सायकलींचा वापर व्यायामाचे वा छंदाचे साधन म्हणून होत आहे. रोजचे धकाधकीचे आयुष्य, बदलती जीवनशैली यांमुळे अनेक जण शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकलींचा आधार घेतात. त्यामुळे सायकलीही आधुनिक झाल्या. परिणामी सायकलींचा गेल्यातच जमा असलेला ‘जमाना’ आताच्या काळातही ‘तग’ धरून आहे. सायकलींच्या आधुनिक विश्वाची ही सैर...

बहुतेकांच्या आयुष्याची सुरुवात लहानपणी तीनचाकी सायकलने झाली. जस जसे मोठे होत गेलो, तसे दोनचाकी सायकलशी आपला परिचय झाला. पूर्वी अॅटलस, हिरो, हॅर्क्युलस, एवोन यासारख्या कंपन्यांच्या सायकली असल्या तरी अॅटलस सायकलने आपली वेगळीच छाप पाडली होती. ‘दणकट’ हीच तिची ओळख. सर्वप्रकारच्या घरगुती कामांसाठी तिचा वापर होत होता. कालांतराने इतर कंपन्यांच्या सायकली येऊ लागल्या. मग गिअर, सस्पेन्शन, डिस्क ब्रेक, स्टायलीश व्हील असलेल्या सायकली आल्यानंतर स्पर्धा वाढली आणि सायकलींची मागणीही. मोबाईल क्रांती, आधुनिक वाहनांमुळे मधल्या काळात बच्चेकंपनीचा सायकलींकडे ओढा कमी झाला होता. परंतु, सायकल कंपन्यांनीही आकर्षक आणि आधुनिक फिचर्ससह सायकली पुन्हा बाजारात आणल्यामुळे बच्चे कंपनीबरोबरच मोठ्यांचाही सायकलींकडे ओढा वाढला आहे.

ट्रेक (Treck Cycle)

ट्रेक ही अमेरिकन कंपनी असून, भारतातील सर्वाधिक सायकल उत्पादक कंपनींपैकी एक आहे. भारतासह ९० देशांमध्ये या कंपनीच्या सायकल विक्रीस आहेत. भारतात या कंपनीच्या सायकलींची किंमत ३० हजार ८९९ रुपयांपासून (मॉडेल : एफएक्स-१) सुरू होते. तर ५ लाख ५४ हजार २९९ ही (मॉडेल : फ्युएल ईएक्स ९.९ एक्सओ १) या कंपनीची सर्वांत महागडी सायकल आहे. या कंपनीने ५५ विविध प्रकारच्या सायकली भारतीय बाजारात आणल्या आहेत.

राले (Raleigh)

राले ही ब्रिटिश कंपनी असून, भारतातील प्रसिद्ध सायकल उप्तादक ब्रँड आहे. १००हून अधिक देशात या ब्रँडच्या सायकली विक्री होतात. भारतात या कंपनीच्या सायकलींची किंमत ५ हजार ७७५ (मॉडेल : स्ट्रिट २०) रुपयांपासून सुरू होते, तर ५३ हजार ९९९ रुपयांत कंपनीचे ‘इंट्युटीव्ह’ हे मॉडेल मिळते. भारतात या कंपनीने ५३ विविध प्रकारच्या सायकली बाजारात आणल्या आहेत.

मेरिडा (Merida)

मूळची तैवान देशातील असलेला हा सायकलचा ब्रँड भारतातही प्रसिद्ध आहे. मेरिडाच्या १८५ विविध प्रकारच्या सायकली भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. भारतात या कंपनीच्या सायकली ३० हजारांपासून (क्रॉसवे १५ व्ही) ते ३ लाख २७ हजार रुपये (बिग नाईन ७०००) या किमतीत उपलब्ध आहेत. ७० हून अधिक देशात या ब्रँडच्या सायकली विक्री होतात.

रोडलर्क इलेक्ट्रिक (Roadlark)

भारतातील ‘नेक्सझू मोबिलिटी’ कंपनीची ‘रोडलर्क इलेक्ट्रिक सायकल’ ४२ हजार रुपये किमतीत उपलब्ध आहे. ही सायकल नुकताच भारतात दाखल झाली. जी एकदा चार्ज केल्यावर १०० किलोमीटर धावत असल्याचा कंपनीचा दावा आहे. रोडलर्कमध्ये ‘ड्युअल बॅटरी सिस्टम’ असून, मुख्य बॅटरी ८.७ एएचच (Ampere Hour) आणि दुसरी ५.२ एएचची इन-फ्रेम बॅटरी आहे, जी घरगुती सॉकेटवर चार्ज करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : संविधानावर बोलताना राहुल गांधींचा माईक झाला बंद, सुरु होताच म्हणाले, कितीही प्रयत्न करा, पण...

Potato : सर्वांच्या लाडक्या बटाट्याचा जन्म भारतातला नाहीच ! बटाट्याच्या भाजीच्या अनेक पद्धती काय ? जाणून घ्या आरोग्याचे फायदे

Pan Card Update : महत्त्वाची बातमी! बंद होणार जुने पॅनकार्ड, जाणून घ्या नव्या पॅन कार्डसाठी किती खर्च येईल

Farmers Income: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना; शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 20,000 रुपये

IPL Auction: १३ वर्षीय Vaibhav Suryavanshi साठी राजस्थानने का मोजले १ कोटी! द्रविडने सांगितलं कारण; वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT