youth motivation 
युथ्स-कॉर्नर

उपक्रमांतून गवसले सामाजिक भान : ‘यिन’नचे पंधरा उपक्रम ठरले; राज्यातील तरुणाईसाठी संजीवनी.

टीम YIN युवा

‘सकाळ’ माध्यम समूहाचे ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या व्‍यासपीठाद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. नेतृत्व म्हणजे ‘यिन’. तरुणाईला दिशा म्हणजे ‘यिन’. नेतृत्वाची ओळख म्हणजे ‘यिन’.

आम्ही या तरुणांच्या चळवळीत सर्व युवकांना सामील करून घेत असतो. महाविद्यालयीन तरुण या चळवळीचा भाग आहेत. त्यांना आम्ही ‘यिनर्स’ म्हणतो. ही चळवळ १९ ऑगस्ट २०१४ ला मुंबईमधून ‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय अभिजित पवार सर यांच्या संकल्पनेतून व सुप्रसिद्ध सिनेअभिनेते अमीर खान यांच्या उपस्थितीत सुरू झाली.

राज्यात आजपर्यंत ‘यिन’चे ६६ लाख सभासद आहेत. आम्ही महाविद्यालयाच्या तरुणाईला घेऊन वेगवेगळे कार्यक्रम राबवित असतो. हे कार्यक्रम व्यक्तिगत, सामाजिक आणि करिअरच्या दृष्टिकोनातून युवकांचा विकास साधत असतात.

‘यिन’ हे व्यासपीठ बघता बघता खूप मोठी भरारी घेत आहे. नवव्या वर्षांत पदार्पण करत असल्याने ‘यिन @ ९’ वार्षिक अंकाच्या माध्यमातून वर्धापन दिन साजरा करत आहोत. आजतागायत विविध उपक्रमांच्या माध्यमातून तरुणाईला पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावसायिक व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या उपक्रमांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

१) चला घडू देशासाठी :
शहरी आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयीन तरुणाईत अमूलाग्र बदल दिसून आले. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासनातील दिग्‍गज अधिकारी, उद्योजक, सामाजिक चळवळीतील नामवंत व्यक्ती, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, विविध शिक्षण संस्थांचे प्रमुख यांच्या अनुभवाची शिदोरी ‘चला घडू देशासाठी’ या उपक्रमातून महाविद्यालयीन तरुणाईला मिळालेली आहे.

या उपक्रमाचे फलित अर्थातच राजकारणातील नवोदित तरुणाईला चालना मिळाली, प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी अनेकांना दिशा मिळाली. समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करणे तसेच स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचा खऱ्या अर्थाने फायदा ‘यिन’ शी जोडलेल्या असंख्य तरुणांना झाला.

२) ‘यिन’ संवाद :
राज्यभरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासू व प्रेरणादायी व्यक्तींचे संवाद ‘यिन’च्या वतीने आयोजित करत असतो. या माध्यमातून तरुणाईला आपल्याच महाविद्यालयात पुस्तकी ज्ञानाबरोबरच उमेदीने जगण्याची प्रेरणा ‘यिन संवाद’ या कार्यक्रमातून मिळते.

व्यक्तिमत्व विकासाबरोबरच परिसरातील व्यावसायिक मार्गदर्शन या उपक्रमातून मिळाल्याने महाविद्यालयीन तरुणाईला स्वतःचे उद्योग-व्यवसाय वाढीसाठी मदत झाली आहे.


३) फूटपाथ स्कूल :
विदर्भ विभागातील नागपूर येथे रस्त्याच्या आजूबाजूला भटकणाऱ्या मुलांना शोधून त्यांना एकत्रित करत ‘यिन’ टीमच्या माध्यमातून फूटपाथ स्कूलची निर्मिती केली. वेगवेगळ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या मुलांना बालवाडी ते शालेय शिक्षण मोफत देणे सुरू केले.

या मुलांना लागणारे शालेय साहित्य स्वखर्चातून उभे करत प्रशासनाच्या समोर सकारात्मक भूमिका उभी करण्यात ‘यिन’ची टीम यशस्वी झाली. या प्रेरणादायी कामकाजाचा अहवाल प्रशासनासह शासन दरबारापर्यंत ‘यिन’च्या टीमने पोहोचविला आहे. हा उपक्रम अनेक ठिकाणी पुढे राबविला गेला.

४) लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम :
‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अर्थातच नेतृत्व विकास कार्यक्रम राबविण्यात आला. विद्यापीठ स्तरीय निवडणूका बंद झाल्यानंतर ‘यिन’च्या माध्यमातून सर्वात प्रथम राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये अडीच हजारांहून अधिक महाविद्यालयांत थेट निवडणूका घेण्यात आल्या.

विद्यार्थ्यांमधूनच महाविद्यालयाचा अध्यक्ष बहुमताने निवडल्यानंतर जिल्हास्तरावर त्या जिल्ह्यातील एकूण विजयी उमेदवार अर्थातच अध्यक्षांची लेखी व मुलाखत परीक्षा त्या त्या विभागाच्या ‘सकाळ’ कार्यालयांमध्ये घेण्यात आली. या निवड प्रक्रियेद्वारे जिल्हाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष या पदांची निर्मिती करण्यात आली.

त्यानंतर, जिल्हा स्तरावर निवडलेले दोन प्रमुख याप्रमाणे राज्यभरातील ३६ जिल्ह्यांतील ७२ पदाधिकारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे कॅबिनेट मंत्रीमंडळ निवड प्रक्रियेसाठी पाठविले जातात.

५) ‘यिन’ कॅबिनेट मंत्रीमंडळ :
नेतृत्व विकास कार्यक्रमातून निवड झालेले ७२ पदाधिकारी यांची मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे कॅबिनेट मंत्रीमंडळ निवड प्रक्रिया पार पडते. यामध्ये, सर्वात जास्त मतदान पडलेल्या व मुलाखतीत जास्त गुण असलेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारी मिळते. यामध्ये विरोधी पक्षनेता व विधानसभा अध्यक्ष ही दोन्ही पदे समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

सभागृहातील उर्वरित सर्व पदाधिकारी मतदानाद्वारे निवड प्रक्रियेत सहभागी होतात. ज्या अध्यक्षाला सर्वात जास्त मतदान आहे, त्याची मुख्यमंत्रीपदी निवड होते; तर द्वितीय क्रमांकावर असलेल्या सहकाऱ्याची उपमुख्यमंत्रीपदी निवड होते. त्यानंतर, विरोधी पक्षनेता व सभागृहाचा सभापती निवडला जातो.

उर्वरित सर्वजण त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री व कॅबिनेट मंत्री होतात. या संपूर्ण मंत्रीमंडळाला राज्याचे विधानसभा अध्यक्ष किंवा माजी न्यायाधीश किंवा विधान परिषदेचे सभापती शपथ देतात. युवकांचे देशातील पहिले कॅबिनेट मंत्रीमंडळ ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार सर यांच्या मार्गदर्शनाने उभे राहिल्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

६) ‘यिन’ केंद्रीय कॅबिनेट :

'यिन’ कॅबिनेट मंत्रीमंडळातील सर्व पदाधिकारी वर्षपूर्तीनंतर माजी पदाधिकारी म्हणून ‘यिन’ सोबत काम करत होते. दरम्यान, देशपातळीवर ‘यिन’ची निर्मिती व्हावी म्हणून देशभरात महाराष्ट्र, गोवा व जम्मू-काश्मीर येथे ‘यिन’ पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली.

तसेच राज्यातील सक्रिय पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन केंद्रीय कॅबिनेटची निर्मिती करण्यात आली. केंद्रीय कॅबिनेटच्या माध्यमातून देश पातळीवरील विविध समस्या जाणून घेत तो अहवाल केंद्र शासनाकडे देण्याचे धोरणही ‘यिन’ केंद्रीय कॅबिनेट सभापतींच्या माध्यमातून दिल्ली येथील अधिवेशनामध्ये ठरविण्यात आले.

केंद्रीय कॅबिनेटचे अधिवेशन विविध विभागांत होत असल्याने त्या भागांतील माजी पदाधिकाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.

७) ‘यिन’ गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन :
गणेशोत्सव काळात महानगरपालिका व जिल्हा प्रशासनावरील भार हलका व्हावा, यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये गणेश मूर्ती संकलन व निर्माल्य संकलन उपक्रमांत ‘यिन’च्या टीम सहभागी होत असतात. एक सामाजिक दायित्व ‘यिन’ टीमच्या माध्यमातून उभे करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.

८) ‘यिन’ रक्तदान शिबिर :
सकाळ माध्यम समूह आयोजित ‘यिन’ व्यासपीठाची निर्मिती १९ ऑगस्ट २०१४ ला मुंबई येथे करण्यात आली. १९ ऑगस्ट वर्धापनदिनाच्या निमित्ताने राज्यभर विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते.

राज्य शासनाचा (आरोग्य सेवा) रक्तपेढी विभाग व ‘यिन’ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या रक्तदान शिबिरांमध्ये विविध महाविद्यालयांचे पदाधिकारी उस्फूर्तपणे रक्तदान करतात. या संदर्भातील अनेक प्रमाणपत्र आणि पारितोषिके ‘यिन’ विभागाला प्राप्त आहेत.

९) वर्धापन दिनाचे खास उपक्रम :
१९ ऑगस्टला राज्यभर ‘यिन’ वर्धापन दिन अतिशय उत्साहात आणि पारंपारिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित केला जातो. ढोल वादन, योगा नृत्य व सामाजिक उपक्रमात सहकार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला जातो.

हा वर्धापन दिन पदाधिकाऱ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरत आहे. या निमित्ताने, राज्यभर रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण यासारख्या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येते.

१०) ‘यिन’ आरोग्य सहाय्यता कक्ष :
राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमध्ये गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रियांना लागणारी मदतही ‘यिन’च्या माध्यमातून केली जाते. महाविद्यालय अध्यक्षांपासून सदस्यांपर्यंत अनेक सहकाऱ्यांनी या आरोग्य सहाय्यतेचा लाभ घेतलेला आहे.

नाशिक जिल्ह्यातील अंदरसुल गावातील इयत्ता दुसरी वर्गात शिक्षण घेत असलेल्या सानिया शेख या मुलीवर कॅन्सर उपचार केल्याने तिला उमेदीने जगण्याची संधी मिळाली आहे.

अशा प्रकारच्या असंख्य शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून ‘यिन’ पदाधिकाऱ्यांनी सामाजिक दायित्व म्हणून पार पाडल्या आहेत. मागच्या चार वर्षांत तीन कोटी रुपयांची मदत ‘यीन’च्या माध्यमातून गाव पातळीवर गेली आहे.

११) ‘यिन’ प्राचार्य परिषद :
सकाळ माध्यम समूहाने नेतृत्व विकास कार्यक्रम अर्थातच लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामची निर्मिती केल्यानंतर महाविद्यालयातील विविध परवानग्‍यांना अनुसरून ‘यिन’ प्राचार्य बैठका, प्राचार्य परिषदेचे आयोजन केले जाते.

सर्वप्रथम महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ‘सकाळ’च्या विभागीय कार्यालयात ‘यिन’च्या सर्व उपक्रमांबद्दलची सविस्तर माहिती प्राचार्य बैठकीमध्ये दिली जाते. या बैठकीत प्राचार्य उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत असतात.

१२) ‘यिन’ पोलिस मित्र :
जिल्हा व महानगर पोलिस प्रशासनाला विविध सण-उत्सवांमध्ये पोलिस बंदोबस्ताच्या दरम्यान इतर सामाजिक संस्था व उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद अपेक्षित असतो. याच भूमिकेला अनुसरून त्या त्या जिल्ह्यांतील ‘यिन’ पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस प्रशासन व महानगर पोलिस प्रशासनाला मदत व्हावी, यासाठी पोलिस मित्र म्हणून कामगिरी बजावत आहेत.

१३) यिन वॉरियर्स :
कोरोना काळामध्ये सामाजिक स्तरावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक संस्था, प्रत्येक व्यक्ती आपल्या पातळीवर माणसे वाचविण्यासाठी प्रयत्न करत होते. याच दरम्यान, पाठीवरती थाप टाकून लढण्यासाठी ‘यिन’ विभाग पुढे आला.

‘यिन वॉरियर्स’ या मॅक्झिनमध्ये गावकुसापासून ते महानगरापर्यंत प्रत्येक वॉरियर्सचा शब्दरूपी सन्मान करत कोरोनात जगण्यासाठी प्रेरित व वाचविण्यासाठी हातभार करणाऱ्या असंख्य वॉरियर्संना या निमित्ताने सन्मानित करण्यात आले.

१४) यिन मिशन हेल्प :
राज्यातील सर्व ठिकाणी ‘यिन मिशन हेल्प’ उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत १०० ‘यिन’ पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेत शासनाला मदत करण्याचा ठराव घेण्यात येतो. हे दरवर्षी ठरते आणि त्याप्रमाणे पुढे काम चालते.

या उपक्रमांत रक्तदान शिबिर, एखाद्या पेशंटला लागणारे कुठलीही मदत, जेवणाचा डबा, स्मशानभूमीमध्ये सहकार्य असे अनेक उपक्रम जिल्हा प्रशासन, महानगर प्रशासनाला अतिशय महत्त्वकांक्षी पद्धतीने मदत करत असतात. या उपक्रमांमुळे ‘यिन’ मधील सामाजिक बांधिलकी व प्रशासनाला मिळालेले सहकार्य ही उल्लेखनीय कामगिरी आजही शासनस्तरावर चर्चिली जात आहे.

१५) आमची १०० झाडं :
सकाळ माध्यम समूह आयोजित यिन व्यासपीठाने राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘आमची १०० झाडं’ उपक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. विविध महाविद्यालयांचे पदाधिकारी या उपक्रमात हिरीरीने सहभाग घेत आहेत.

‘यिन’ मुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध ठिकाणी या उपक्रमाची सुरुवात होत असून महाविद्यालयाचे प्राचार्य या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. पर्यावरणामध्ये आपला सहभाग दरवर्षी असतोच; परंतु यावर्षी ‘आमची शंभर झाडं’ हा उपक्रम महाविद्यालयापासून विद्यापीठापर्यंत राबविण्याची सुरुवात ‘यिन’ विभागाने राज्यभर केलेली आहे

- गणेश जगदाळे
(यिन, उत्तर महा.विभागीय अधिकारी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

जीगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

Waris Pathan: वारिस पठाण पत्रकार परिषद सुरु असतानाच ढसाढसा रडले, म्हणाले, सगळेच माझ्या मागे हात धुवून मागे लागले अन...

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

SCROLL FOR NEXT