दादासाहेब भगत सक्सेस स्टोरी Esakal
युथ्स-कॉर्नर

Infosysमध्ये ऑफिस बॉयचं काम करणाऱ्या दादासाहेबला अशी सुचली स्टार्टअपची कल्पना.. आज आहे दोन कंपन्यांचा मालक

बीडमधील दादासाहेब भगत हा तरुण एकेकाळी इन्फोसिस कंपनीच्या Infosys गेस्ट हाऊसमध्ये चहा-पाणी देण्याचं काम करायचा. आज त्याच्या स्वत:च्या दोन कंपन्या आहेत. दादासाहेब भगत या तरुणाने मेहनतीने नावलौकिक मिळवला आहे

Kirti Wadkar

संकटावर मात करावी, जिद्दीने प्रयत्न करावे हे बोलणं सोपं असलं तरी प्रत्यक्षात बिकट परिस्थितीवर मात करून धैर्याने आणि अविरत कष्टाने यश संपादन करणं हे अत्यंत कठिण असतं. स्वप्न उराशी बाळगून यश मिळवण्यासाठी अनेकजण धडपड करतात. मात्र यश सगळ्यांच्या पदरी पडत नाही. Success Journey of Beed youth Dadasaheb Bhagat Office Boy in Infosys to owner of two companies

जो खऱ्या अर्थाने कोणत्याही प्रसंगात मागे हटत नाही, कायम नाविन्याचा ध्यास धरतो आणि मेहनतीने काहीतरी शिकण्याची तयारी ठेवतो त्याता यशाचा Success प्रवास सोपा होतो. बीडमधील एका तरुणाने अशाच प्रकारे आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि अभ्यासूवृत्तीने यशाचं शिखर गाठलं आहे.

बीडमधील दादासाहेब भगत हा तरुण एकेकाळी इन्फोसिस कंपनीच्या Infosys गेस्ट हाऊसमध्ये चहा-पाणी देण्याचं काम करायचा. आज त्याच्या स्वत:च्या दोन कंपन्या आहेत. दादासाहेब भगत या तरुणाने मेहनतीने नावलौकिक मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi देखील मन की बात कार्यक्रमात त्याचं कौतुक केलंय.

दादासाहेब भगतचा जन्म बीड जिल्ह्यातील. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने पुण्यात येऊन आयटीआयचा कोर्स पूर्ण केला. मात्र त्यावेळी नोकरीची गरज असल्याने त्याने इन्फोसिसच्या गेस्ट हाऊसमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. रुम सर्व्हिस बॉय म्हणून तो नोकरी करू लागला. आलेल्या पाहुण्यांना चहा-पाणी देण्याचं काम तो करत. यावेळी त्याला महिन्याला ९ हजार पगार होता.

हे देखिल वाचा-

दिवसा नोकरी रात्री शिक्षण

या नोकरीदरम्यान दादासाहेबला लक्षात आलं होतं की नोकरी करणं पुरेसं नव्हे. याचवेळी सॉफ्टवेअर आणि डिजीटल क्षेत्राचं महत्व त्याच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे दिवसा नोकरी केल्यानंतर त्याने रात्री ग्राफिक डिझायनिंग आणि अॅनिमेशनचा कोर्स सुरु केला. त्यानंतर त्याला मुंबईत नोकरी मिळाली. मात्र दादासाहेबला आणखी मेहनत घ्यायची होती आणि ज्ञानग्रहण करायचं होतं.

मुंबईनंतर दादासाहेबने हैदराबादकडे मोर्चा वळवला. इथं त्याने नोकरी करत असतानाच C++ आणि Pythonचा कोर्स पूर्ण केला. नोकरी करत असतानाच त्याला डिझाइन आणि टेम्पेलेट्सच्या लायब्ररीवर काम करण्याची संकल्पना सुचली. इथूनच दादासाहेबच्या स्टार्टअपला सुरुवात झाली.

२०१५ सालामध्ये पहिली कंपनी

२०१५ सालामध्ये दादासाहेब भगत या तरुणाने Ninthmotion ही त्याची पहिली कंपनी सुरु केली. काही काळातच या कंपनीशी ६,००० ग्राहक जोडले गेले.

ग्राफिक डिझायनिंगसाठी नवं सॉफ्टवेअर तयार केलं

दादासाहेबला कायमचं नाविन्याचा ध्यास होता. या जिद्दीने त्याने ग्राफिक डिझायनिंगसाठी ची वाट धरली. कॅनव्हासारखं एक नवं सॉफ्टवेअर तयार केलं. लॉकडाउन दरम्यान दादासाहेबला गावची वाट धरावी लागली. मात्र इथंही काम सुरुच राहिलं.

गुरांच्या शेडमध्ये त्याने गावातील काही तरुणांना ग्राफिक डिझायनिंग आणि अॅनिमेशन शिकवलं आणि त्यांना नोकरी दिली. २०२० सालामध्ये त्याने ग्राफिक डिझायनिंगसाठी सॉफ्टवेअर तयार करुन DooGraphics या नव्या कंपनीची स्थापना केली.

एकेकाळी गेस्ट हाऊसमध्ये ९ हजारांची नोकरी करणाऱा दादासाहेब आज दोन कंपन्यांचा मालक असून लाखोंची कमाई करत आहे. २०२० सालामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मन की बात या कार्यक्रमात तरुणांना प्रेरणा देण्यासाठी दादासाहेब भगत या तरुणाचा दाखल देत त्याचं कौतुक केलं होतं.

हे देखिल वाचा-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT