अभिजीत पवार सरांच्या संकल्पनेतून उदयास आलेले यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात ‘यिन’ जे युवकांना एकत्र करणारे मोठे व्यासपीठ आहे. ‘यिन’ हे माझ्यासाठी राजकारण, समाजकारण करताना कसे वागावे, हे शिकवणारे व एक संस्कार देणारे विद्यापीठ आहे. ‘यिन’मुळे मला माझ्या मधील नेतृत्व गुण विकसित करता आला. ‘यिन’शी २०२२ पासून कॉलेज अध्यक्ष या पदापासून संबंध येण्यास सुरुवात झाली. ‘यिन’ म्हणजे नेमकं काय ? हे माहित नव्हतं. तेव्हा, नेमकी त्याची माहिती समजून घेतली. अवधूत गायकवाड सर यांनी ‘यिन’बद्दल संपूर्ण माहिती दिली. त्यामध्ये, तुमच्याकडे पद असो किंवा नसो तुम्ही काम करू शकता. तुमची काम करण्याची तयारी असेल; तर हे तुमचंच व्यासपीठ आहे, असे सांगितले. त्यामुळे, आपण काहीतरी करण्यासाठी नक्कीच या व्यासपीठावर काम करू या हे ठरवले. २०२२ चे पूर्ण वर्ष वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी झाले. त्यामुळे, कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे ?, त्यामध्ये सुसूत्रता कशी आणावी ?, सर्वांना मिळून मिसळून घेऊन नेमकं काम कसं करावं ?, एकत्र टिमने कसे काम करावे ? या सर्वच गोष्टी शिकता आल्या. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून वेगवेगळ्या मान्यवरांना भेटण्याची संधी मिळाली. आम्ही बाकीच्यांपेक्षा वेगळं काहीतरी करतो आहोत, हे यामुळे समजले. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांमध्ये आपले नाव, आपला फोटो छापून येणे. त्याद्वारे, समाजात मिळणारी ओळख, मिळणारा मान-सन्मान यामुळे घरचे देखील या गोष्टीसाठी पाठिंबा देऊ लागले. आधीपासूनच समाज सेवेची आवड होती. आपल्याला दुसऱ्यासाठी काहीतरी करायचे असते; पण, त्यासाठी योग्य व्यासपीठ किंवा प्रोत्साहन देणारे कोणीतरी हवे असते. ते योग्य व्यासपीठ मिळाल्यामुळे काम करण्याची तयारी आणखी वाढली. वेगवेगळे पुरस्कार मिळाले. वेगळ्या भागांतील वेगवेगळे युवक जोडले गेले. मित्र परिवार मोठा होण्यास मोठी संधी मिळाली. २०२३ च्या निवडणुकीमध्ये जिल्हा कार्याध्यक्ष, राज्य संपर्क प्रमुख तथा स्त्री प्रतिष्ठान समिती, अध्यक्ष या पदांवर संधी मिळाली. त्यामुळे, जबाबदारी अधिक वाढली. मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेतले गेले पाहिजे. अधिक काम केले पाहिजे. यादृष्टीने, राजकीय, कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील लोकांशी ओळख झाली. आपल्याकडे एक पद आहे आणि या पदामुळे आपल्याला खूप मान-सन्मान मिळतो. त्यामुळे, आपण नेहमी चांगले वागले पाहिजे, आपले वर्तन चांगले झाले पाहिजे या सर्व गोष्टी समजायला लागल्या. ‘यिन’मध्ये असलेले ‘समर युथ समीट’, कला महोत्सव असे वेगवेगळे उपक्रमांमुळे एक वेगळी संधी आणि कला गुणांना वाव मिळाला. आयुष्यात संधी आल्यानंतर त्या संधीचं सोनं करायचं असतं; कारण आयुष्यामध्ये आलेली संधी नेहमीच आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करते. व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी स्वतःच्या कलागुणांना वाव मिळणे गरजेचे आहे. ‘यिन’ मुळे मला माझ्या कल्पना तिथे मांडता आल्या. युवकांना संघटित करून काम करता आले. त्याबरोबर आलेली संधी या सगळ्यांचा योग्य तो वापर करून आपले व्यक्तिमत्व अधिक समृद्ध करण्यासाठी मला खूप मदत झाली.
- राजलक्ष्मी कदम, ‘यिन’ राज्य संपर्क प्रमुख तथा अध्यक्ष, स्त्री प्रतिष्ठान समिती, कोल्हापूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.