United Nations : तालिबानमध्ये महिलांवर कठोर निर्बंध! संयुक्त राष्ट्राचा गंभीर इशारा...

Sandip Kapde

इस्लामाबाद : तालिबानने अफगाणी महिला आणि मुलींवरील निर्बंध मागे न घेतल्यास ती स्त्रीहत्या ठरू शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) तज्ज्ञांनी शुक्रवारी दिला.

अफगाणिस्तानमध्ये ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने सत्ता हस्तगत केल्यापासून तेथील महिलांना नोकऱ्या करण्यावर निर्बंध घातले आहेत. मुलींना सहावीनंतर शिकण्यास मनाई केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी जाण्यास महिलांना बंदी असून घरातून बाहेर पडताना डोके झाकून घेणे बंधनकारक आहे. तालिबानी सरकार हे स्त्रीद्वेष्टे आहे, अशी टीका ‘यूएन’च्या निवेदनात तज्ज्ञांनी केली.

निर्बंध मागे न घेतल्यास अनेक टाळता येण्याजोगे मृत्यू होऊ शकतात, जी स्त्रीहत्या ठरू शकते. तालिबानने लादलेली बंदी यामुळे आंतरराष्ट्रीय निषेध आणि संताप निर्माण झाला आहे; मात्र ते मागे घेण्याची कोणतीही तयारी तालिबानने दाखविलेली नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.