Healthy Lifestyle : शंभर वर्ष जगायचंय? तेसुद्धा निरोगी, मग या पद्धतीने बनवा भाजी

साक्षी राऊत

Healthy Lifestyle : निरोगी आयुष्य जगण्यासाठी जेवणात संतुलित आहार घेणे फार महत्वाचे आहे. जेवणात भाज्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र बहुतेक लोकांना भाज्या तयार करण्याची योग्य पद्धत माहिती नाही. भाजी बनवणे म्हणजे चवीपुरते भरपूर तेल आणि मसाले घालणे नव्हे. त्यासाठी फ्लेम, वेळ, साहित्य इत्यादी गोष्टीही लक्षात ठेवाव्या लागतात.

आज आम्ही तुम्हाला अशी भाजी बनवण्याची पद्धत सांगणार आहोत ज्याद्वारे तुमची भाजी अगदी टेस्टी बनून त्याद्वारे तुम्हाला संपूर्ण पोषक तत्वे मिळतील आणि तुमचे आयुष्य वाढेल, चला तर जाणून घेऊया सविस्तर.

शास्त्रज्ञ डॅन ब्यूटनर यांच्या मते, ग्रील, इटली,कोस्टा रिका आणि अमेरिका ही काही ठिकाणे ब्लू झोन म्हणून ओळखली जातात. आणि येथे राहणारे लोक शंभर वर्षाहून अधिक जगतात, असे इनसायडरच्या अहवालात नमूद आहे.

मसाल्यांचा योग्य वापर

येथे राहणाऱ्या लोकांना मसाले कसे वापरायचे हे उत्तम माहिती आहे. भाजीपाला हा बऱ्याचदा चवीला फिका असतो परंतु मिसो, मशरूम सारख्या गोष्टींमध्ये, औषधी वनस्पती, मसाले आणि तीळ किंवा ऑलिव्ह ऑइलसह योग्य प्रकारे बनवल्यास त्याची चव वाढते. (Lifestyle)

भेंडीच्या भाजीत घाला या दोन गोष्टी

ब्यूटनर सांगतात की, सगळ्यात टेस्टी त्यांनी खाल्लेली भाजी होती ती भेंडीची. तिची चव वाढवण्यासाठी त्यात सेसमी सिड्स (तीळ) आणि लाल मिर्चीचा वापर करण्यात आला होता. या पद्धतीने भाजी, बनवल्यास अॅसिड आणि उष्णता संतुलित प्रमाणात राहते. तिळामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी-6 यांसारखे पोषक तत्व आढळून येतात. याच्या सेवनाने हृदय, मेंदू आणि हाडे निरोगी राहतात. तर लाल मिर्चीमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे तुमची इम्युनिटी पावर वाढते. (Health)

प्रत्येकवेळी एकाच पद्धतीने भाजी बनवू नका

ब्यूटनर यांच्या मते, प्रत्येक वेळी भाजी बनवण्यासाठी एकाच पद्धतीचा वापर करू नये. तुम्हाला मसाल्यांचा योग्य वापर करता यायला हवा. दीर्घायुषी लोकांचे सीक्रेट म्हणजे असे लोक त्यांच्या जेवणात प्लांट बेस्ड फूडचे सेवन जास्त करतात.

डिस्क्लेमर : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.