सकाळ ऑनलाईन टीम
Mouth Cancer : शारीरिक आरोग्य सदृढ राखण्यासाठी प्रयत्न होतात. परंतु, मौखिक तसेच दातांच्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आपल्या मौखिक आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करतात. सर्वांगीण आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीने मौखिक आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे.
मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास याचा परिणाम वृद्धावस्थेत होतो. त्यातच महाराष्ट्रात गुटखा, सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. शासनाकडून धडक मोहीम राबवली जाते. पण, तरीही चोरट्या मार्गाने मिळणारा गुटखा अनेकजण खातात. गुटखा आणि तंबाखूच्या व्यसनामुळे कॅन्सर होतो. तो होण्याची पहिली पायरी स्वतःच मौखिक निरीक्षण केले तर लक्षात येते, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले.
एखादा दात जोपर्यंत खूपच ठणकायला लागत नाही, तोपर्यंत लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मौखिक आरोग्याचा मनुष्याच्या सामान्य आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे. मौखिकशुद्धता आणि दंत आरोग्य याकडे नागरिकांचे लक्ष नाही. यामुळे वृद्धावस्थेत मौखिक पेशींवर परिणाम होतो. या दुर्लक्षितपणामुळे चघळणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थामुळे मुखपुर्व कॅन्सर होतो. याचे विद्यार्थी आणि तरुणांमध्ये प्रमाण जास्त आहे.
पांढरे चट्टे
लाल चट्टे
तोंड न उघडण्याची व्याधी
दररोज सकाळी आणि रात्री किमान तीन मिनिटे दात ब्रशने स्वच्छ करा
टंग क्लीनर किंवा हाताने जीभ नियमितपणे स्वच्छ करा
दातांतील अन्नकण टोकदार वस्तूने न काढता ‘डेंटल फ्लास’ वापरा
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून कटाक्षाने दूर राहिले पाहिजे.
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा कॅन्सर होतो. तंबाखू आणि इतर व्यसन करणाऱ्यांना सहा पट अधिक कॅन्सरचा धोका असतो. यामुळे तंबाखू, बीडी, सिगरेट या व्यसनापासून दूर राहावे. तोंडाची जखम झाली असेल व ती बरी होत नसेल, तोंड उघडत नसेल तर अशा वेळी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.
- डॉ. अरविंद गायकवाड,
विशेष कार्याधिकारी, शासकीय कॅन्सर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.