Vericose Veins : वेदना होत नसलेला आजार! 99% लोकांना या आजाराबाबत माहिती नाही, जाणून घ्या सविस्तर

सकाळ ऑनलाईन टीम

Vericose Veins : शरीरात रक्तवाहिन्या(व्हेन्स) रक्त वाहून नेण्याचे काम करतात. या वाहिन्यांमध्ये कुठल्या कारणाने रक्त जमा झाले आणि त्यामुळे त्या फुगीर झाल्या तर या त्रासाला वैद्यकीय भाषेत व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात. मराठीत ‘अपस्फित नीला’ असेही संबोधले जाते. अनेकदा या रक्तवाहिन्या पायाच्या पृष्ठभागावर ठळकपणे दिसतात.

या आजारात वेदना होत नाहीत. परंतु त्वचेचे रूप बदलते. जास्त वेळ उभे राहण्याबरोबरच जास्त वेळ बसून राहणेही अशा व्यक्तीच्या आरोग्यासाठी घातक ठरते. यावर रेडिओ इन्व्हेन्शनल थेरपी अतिशय प्रभावी ठरत असल्याचे निरीक्षण रेडिओलॉजिस्ट डॉ. रमेश पराते यांनी नोंदविले आहे.

यांना असते जास्त जोखीम

बस कंडक्‍टर

शिक्षक

जास्त वजन असलेल्या

गर्भवती

स्थूल प्रकृती असणाऱ्या व्यक्ती

आनुवंशिकता

लठ्ठपणा

सतत धूम्रपान केल्यास

उंच टाचांच्या चपलांचा वापर

जास्त मिठाचे अन्नपदार्थ सेवन केल्यास

आजाराची लक्षणे

घोट्याजवळचा भाग लालसर काळसर होणे

रक्तवाहिनीवर गाठी येतात

पोटरीच्या भागात गाठी जाणवणे

पायावर सूज येणे

हातापायावर फोड येणे

अंगाला खाज सुटणे (Lifestyle)

काय आहे धोका

रक्तवाहिनीवरील गाठ फुप्फुसात शिरल्यास मृत्यूचा धोका

खराब रक्त साचल्यास पायावर सूज

रक्तगाठ हृदयात शिरल्यास हृदयरोगाची जोखीम

फुगलेली रक्तवाहिनी फुटून रक्तस्रावाची शक्‍यता

हे टाळावे

जास्त वेळ उभे राहणे टाळावे

मांडी घालून, पाय दुमडून बसणे टाळावे

जास्त काळ एका ठिकाणी बसणे टाळावे

हे उपाय करा

पायात सैल कपड्याचा वापर

विशिष्ट प्रकारचे मोजे वापरणे

पाय उशीवर उचलून ठेवणे

पाय हलवत राहणे

आहारात तंतुमय पदार्थाचे सेवन करावे

पोहणे, चालणे, सायकल चालवण्याचा व्यायाम करावा

व्हेरिकोज व्हेन्सचे निदान ‘डॉपलर स्कॅन’ द्वारे होते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये तो जास्त दिसून येतो. (Health) नियमित व्यायाम आणि वजन आटोक्‍यात ठेवल्यास या समस्या टळतात. मात्र याचे प्रमाण वाढल्यास लेजर थेरपी, स्क्लेरो थेरपी, रेडिओ फ्रिक्वेंसी ॲब्लेशन आणि ॲम्ब्यूलेटरी फ्लेबेक्टोमी या वैद्यकीय प्रक्रियेतून यावर उपचार होतात. व्हेन स्ट्रिप्पिंग ही शस्त्रक्रिया व्हेरिकोज व्हेन्सवरील उत्तम पर्याय आहे.

-डॉ. रमेश पराते,

सहयोगी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.