सकाळ डिजिटल टीम
Buying Car On Diwali : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही मॉडेल आधीच ठरवले असतील. काही लोक नवीन कार घेण्याचा विचार करतात परंतु कोणती कार घ्यायची हे माहित नसते. भारतासारख्या देशात नवीन कार खरेदी करणे हे एखाद्या संघर्षापेक्षा कमी नाही. बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
हॅचबॅक, सेडान, एसयूव्ही, एमपीव्ही, अशा अनेक बॉडी स्टाइल आणि प्रकार आहेत की खूप गोंधळ उडतो. हा सणासुदीचा हंगाम असून, नवीन कार खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. सणासुदीच्या काळात तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूट मिळाल्यास तुम्ही नवीन कार खरेदी करावी का?
भारतात मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स, महिंद्रा, किया असे अनेक लोकप्रिय ब्रँड आहेत. सणासुदीचा काळही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो कारण बाजारात नवीन मॉडेल्स लाँच करण्याची हीच वेळ असते. कार कंपन्या विशेषतः लोकप्रिय कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करतात .
फेसलिफ्ट मॉडेल्स म्हणजे काय ?
एकूणच तुमच्याकडे दोन पर्याय शिल्लक आहेत. सणासुदीच्या काळात, तुम्ही एकतर सध्याची मॉडेल्स प्रचंड सूट देऊन खरेदी करू शकता किंवा फेसलिफ्ट केलेल्या मॉडेलची वाट पाहू शकता. त्याआधी, फेसलिफ्ट मॉडेल म्हणजे काय ते जाणून घेऊया. वास्तविक, जेव्हा एखादी कंपनी सध्याच्या कारमध्ये किंचित बदल करून आणि फीचर्स अपडेट करून नवीन मॉडेल लॉन्च करते तेव्हा त्याला फेसलिफ्ट मॉडेल म्हणतात.
फेसलिफ्ट मॉडेलचा फायदा
अलीकडे Kia Seltos, Tata Nexon, Tata Safari, Tata Harrier चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले गेले आहेत. नवीन फीचर्स आणि अपडेट्ससह या कार्स पुन्हा बाजारात दाखल झाल्या आहेत. आधीच्या मॉडेलनुसार त्यांच्या किमतीत थोडा बदल होऊ शकतो, परंतु त्या बदल्यात तुम्हाला उत्तम वैशिष्ट्यांनी सज्ज असलेली नवीन कार मिळेल. फेसलिफ्ट मॉडेलमध्ये, आधीच्या मॉडेलमधील कमतरता दूर केल्या जातात.
आता लोक सेफ्टी फीचर्स बद्दल खूप जागरूक झाले आहेत. त्यामुळे, जास्तीच्या एअरबॅग्ज आणि ADAS सारख्या उत्तम सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेल्या कारची मागणी बाजारात वाढत आहे. 5 डोअर महिंद्रा थार व्यतिरिक्त आगामी काळात Hyundai Creta, Kia Sonet आणि Mahindra XUV300 चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले जाऊ शकतात.
सणासुदीच्या काळात तुम्ही भरघोस सवलतींचा फायदा घेऊन नवीन कार खरेदी करू शकता, परंतु नवीन मॉडेलचा आनंद तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला आधीच बाजारात असलेले मॉडेल्स विकत घ्यावे लागतील. याशिवाय काही कंपन्या 2022 मॉडेल्सवर सूट देत आहेत, म्हणजे तुम्हाला मागच्या वर्षी बनवलेली कार मिळेल.दुसरीकडे, जर तुम्ही फेसलिफ्ट मॉडेलची वाट पाहत असाल तर तुम्हाला अधिक चांगल्या फीचर्स आणि अपडेट्सचा लाभ घेता येईल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.