Startup Success Laxmi Pujan:  Sakal
लाइफस्टाइल

Diwali 2024: तुम्ही नवे स्टार्टअप सुरू केले असेल तर यंदा दिवळीत 'अशी' करा पूजा, माता लक्ष्मी होईल प्रसन्न

पुजा बोनकिले

Startup Success Laxmi Pujan: हिंदू धर्मात लोक दिवाळीची आतुरतेने वाट पाहतात. हा सण केवळ जीवनात प्रकाश आणत नाही तर संपत्ती, आनंद आणि समृद्धी वाढवतो. भविष्य पुराणात दिवाळी सणाचे वर्णन व्यापाऱ्यांचा सण असे केले असून बाजारपेठा रोषणाई करणे, सायंकाळी लक्ष्मीपूजन करून आनंद साजरा करण्याची परंपरा आहे.

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने वर्षभर प्रगती आणि संपत्ती कमी होत नाही. जर तुम्हीही यावर्षी स्टार्टअप सुरू केले असेल, तर येथे जाणून घ्या दिवाळीत लक्ष्मीची पूजा कशी करावी, कोणत्या पद्धती आणि नियम आहेत.

व्यवसायात यश मिळवण्यासाठी पुढील गोष्टी ठेवा लक्षात

दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी कार्यालयात किंवा दुकानातील पूजास्थानावर गंगाजल टाकावे.

मुख्य प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढावी. तसेच झेंडू आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावावे.

शुभ मुहूर्तावर कार्यालयातील पूजेच्या ठिकाणी एक पाट ठेवा, लाल कपडा पसरून त्यावर लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा.

पूजेच्या वेळी मूर्तीचे तोंड पूर्व किंवा पश्चिमेकडे असावे.

दिवा लावा आणि पंचोपचाराने गणेशाची पूजा करा आणि माता लक्ष्मीची पूजा करावी.

माता लक्ष्मीला फळे, फुले, मिठाई, खील, बताशा इत्यादी अर्पण करा.

व्यवसायात यश हवे असेल तर पैशाशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांची आणि खात्याच्या पुस्तकाची पूजा करावी. असे करणे शुभ मानले जाते.

ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या जागेची पूजा करावी.

माता लक्ष्मीची आरती केल्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा.

यंदा दिवाळी कधी साजरी केली जाणार?

यंदा दिवाळी 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर या दोन्ही दिवशी साजरी होणार आहे. दिवाळीत घर आणि ऑफिसमध्ये केल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनात थोडा फरक असतो. सुख-समृद्धीसोबतच तुम्हाला व्यवसायात यश हवे असेल तर माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची मनोभावे पूजा करावी.

दिवाळीत पुढील गोष्टी ठेवा लक्षात

  • दिवाळीत ज्या ठिकाणी काम करता ती स्वच्छ करावी. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.

  • दिवाळीत काळे कपडे परिधान माता लक्ष्मीची पूजा करू नका. माता लक्ष्मी पूजेमध्ये हा रंग अशुभ मानला जातो.

  • या दिवशी रात्री सुद्धा दुकानात किंवा कामाच्या ठिकाणी अंधार होऊ होऊ देऊ नका. मुख्य दरवाजावर दिवा किंवा लाइट लावावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया समोर, भावनिक पोस्ट लिहित म्हणाले...

Manoj Jarange News: पंकजाताईंनंतर धनुभाऊंना जरांगे फॅक्टर जड जाणार?

Kagal Assembly Elections 2024: सर्वच मतदारसंघात ‘पोस्टर वॉर’ जोरात; एकमेकांना डिवचण्याचा प्रकार, टीकात्मक वाक्यांनी रंगत

Chhatrapati Sambhajiraje: कोल्हापूरची जागा स्वराज्यला देणार, काँग्रेसने शब्द दिला होता पण... छत्रपती संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट

Ulhasnagar Vidhansabha Election : वंचित विकास आघाडीने पहिला उमेदवार केला जाहीर; या उमेदवाराला दिले तिकीट

SCROLL FOR NEXT