Vastu Tips: घरातील देवघर कसे असावे? जाणून घ्या नियम, अन्यथा मिळणार नाही पूजेचे योग्य फळ

पुजा बोनकिले

Puja Ghar Temple Vastu Tips: जेव्हा घरात देवघर योग्य ठिकाणी असते तेव्हा कुटूंबावर कायम देवाची कृपादृष्टी राहते. देवी-देवतांची कृपा घरावर राहावी यासाठी देवघर वास्तु नियमानुसार असणे आवश्यक आहे. अन्यथा चुकीच्या दिशेने केलेल्या पूजेचा लाभ मिळत नाही. तसेच अनक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया देवघर कसे असावे.

देवघरासाठी योग्य जागा असावी?

देवघर योग्य ठिकाणी नसल्यामुळे काही वेळा पूजेचे शुभ परिणाम मिळतात. त्यामुळे देवघर बनवताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

देवघर कसे असावे

धदेवगर कुठेही असेल तरी देवतेच्या मुखाची दिशा ईशान्य दिशेला असावी. पूजा करताना ते शुभ मानले जाते.

देवघराचा रंगही शांत असावा. त्यामुळे पांढरा, पिवळा, हलका निळा, नारंगी असे रंग निवडावा.

देवी-देवतांच्या मुर्ती जमिनीपासून वर ठेवा.

वास्तूनुसार, देवी-देवतांच्या भंगलेल्या मूर्ती ठेवणे टाळावे.

पूजा करताना चेहरा कोणत्या दिशेला असावा?

पूजा करताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. वास्तू शास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी उत्तरेकडे तोंड करून आणि ज्ञान मिळविण्यासाठी पूर्वेकडे तोंड करून केलेली पूजा चमत्कारिक लाभ देते.

कोणत्या देवासाठी कोणती दिशा योग्य?

माता देवी आणि हनुमानजींची दक्षिण दिशेला पूजा करावी.

उत्तर दिशेला भगवान गणेशाची पूजा करावी.

माता लक्ष्मीजी आणि कुबेर आणि उत्तर-पूर्व दिशेला पूजा करावी.

पूजा करताना नियम पाळावे

देवघरात सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे दिवा लावावा आणि शंखनाद करावा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. देवघरात सुकलेली फुले कधीही ठेवू नका, वास्तूमध्ये ते शुभ मानले जात नाही. देवघरात हलका हिरवा, पिवळा, जांभळा किंवा मलई असा कोणताही सात्विक रंग वापरल्याने मनाला शांती मिळते.

पुढील गोष्टी लक्षात ठेवा

देवघराच्या खाली किंवा बाजूला शौच्छालय नसावे.

देवघरात हिंसक प्राण्याचे फोटो नसावे.

याठिकाणी मृतांचे फोटो लावणे टाळावे.

देवघरात अखंड दिवा लावावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.