UPI ID: फोन चोरीला गेल्यास 'असे' करा UPI ID ब्लॉक, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

पुजा बोनकिले

How To Block UPI ID: सध्या अनेक लोकांकडे स्मार्ट फोन आहेत. यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाइन पेमेंट करणे सोपे झाले आहे. यामुळे पैसे जवळ कोणी ठेवत नाही. तसेच पैसे देखील बॅकेंत राहतात. पण फोन चोरीला गेला आणि त्यातील सर्व पैसे काढून घेतले तर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. यामुळे तुम्ही तुमचे Google Pay, Phone Pay, Paytm आणि UPI आयडी कसे ब्लॉक करू शकता हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.

यासाठी सर्वात आधी या दोनपैकी कोणत्याही एका क्रमांकावर 02268727374, 08068727374 वर कॉल करू शकता. नोंदणीकृत मोबाइल नंबरवर तक्रार नोंदवावी. येथे OTP मागितल्यावर, सिम कार्ड आणि डिव्हाइस हरवण्याचा पर्याय निवडा. यानंतर तुम्ही कस्टमर केअरशी कनेक्ट व्हाल. येथे तुम्ही तुमचा फोन चोरीला गेल्याची माहिती देऊन लगेच UPI आयडी ब्लॉक करू शकता.

PayTM UPI ID कसा ब्लॉक करावा

पेटीएम यूपीआय आयडी ब्लॉक करण्यासाठी सर्वात पहिले पेटीएम बँकेच्या हेल्पलाइन नंबर -01204456456 वर कॉल करावा. येथे 'लॉस्ट फोन' चा पर्याय निवडावा.

नंतर लॉगआउट फ्रॉम ऑल डिवाइसचा पर्याय निवडा.

यानंतर, पेटीएम वेबसाइटवर जा आणि 24×7 मदत पर्याय निवडा, येथे तुम्ही फ्रॉडची माहीती देऊ शकता किंवा 'मॅसेस अस' यावर क्लिक करू शकता.

हे केल्यानंतर पोलिस अहवाल आणि आवश्यक तपशील द्यावा लागेल. तपशीलांची पडताळणी केल्यानंतर, तुमचे पेटीएम खाते तात्पुरते बंद केले जाईल.

त्याचप्रमाणे, तुम्ही इतर प्लॅटफॉर्मवर इतर व्यवहार देखील करू शकता. प्रत्येक प्लॅटफॉर्मची प्रक्रिया थोडी वेगळी असू शकते. UPI ID आणि नंबर ब्लॉक केल्यानंतर, जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन FIR नोंदवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.