Salman Khan नं लग्नासाठी प्रपोज केलेल्या व्हायरल व्हिडीओवर अखेर जुही चावलानं दिलं स्पष्टिकरण;म्हणाली,'त्यावेळी खरंतर..'

प्रणाली मोरे

Salman Khanचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यानं जुही चावलासोबत आपण लग्न करण्याचा विचार करत होतो असं म्हटलं आहे. चाहत्यांना व्हिडीओ भलताच पसंत आला होता. त्या व्हिडीओत सलमाननं जुहीच्या वडीलांना आपण याविषयी सांगितलं होतं असं देखील म्हटलं आहे.

आता या व्हिडीओवर जुही चावलाची प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्यात ती सलमान खान सोबत असलेली तिची केमिस्ट्री आणि व्हायरल व्हिडीओवर बोलताना दिसत आहे.(Salman Khan viral video propsed juhi chawla for marriage ,now juhi revert)

जुही चावलानं सलमान खानच्या त्या जुन्या मुलाखतीच्या व्हिडीओवर रिअॅक्शन देत म्हटलं आहे की,''जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती तेव्हा सलमान खान नव्हता. तेव्हा माझ्याजवळ एक सिनेमा आला,ज्यामध्ये लीड अभिनेता तो होता. खरं सांगू का,त्यावेळी ना सलमान..ना आमिर कोणालाच मी इंडस्ट्रीत फार ओळखत नव्हते''.

''काही कारणानं तो सिनेमा मी आणि सलमान एकत्र करू शकलो नाही. आणि तो आजपर्यंत त्यावरनं मला चिडवण्याची एकही संधी सोडत नाही. तो नेहमी मुद्दामून म्हणतो,तू माझ्यासोबत सिनेमा केला नाहीस,नकार दिलास...आम्ही एकाच सिनेमात एकत्र काम केलं आहे. पण आम्ही एकत्र खूप स्टेज शोज केले आहेत. दिवाना मस्तानामध्ये त्याचा कॅमियो होता''.

माहितीसाठी सांगतो की,काही दिवसांपूर्वी १९९० सालातील एका मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होती,ज्यामध्ये सलमान खाननं खुलासा केला होता की त्यानं एकदा जुही चावलाच्या वडिलांकडे जुहीला लग्नाची मागणी घातली होती.

पण दुर्भाग्यानं अभिनेत्रीच्या वडीलांनी यासाठी नकार दिला होता. व्हिडीओत सलमान बोलताना दिसत आहे,जुही खूप गोड आहे. प्रेमळ मुलगी आहे. मी तिच्या वडीलांना विचारलं की ,जुहीला ते माझ्याशी लग्न करू देतील का.

तेव्हा मुलाखत घेणाऱ्या निवेदिकेनं विचारलं, 'तुम्ही थेट वडीलांना विचारलं? मग काय म्हणाले ते',तेव्हा भुवाया उंचावून सलमान म्हणताना दिसतोय, ''नाही..तुम्ही दोघे एकमेकांसाठी फिट नाही आहात,हे उत्तर मिळालं''.

जुही चावला आणि सलमान खाननं केवळ अनिल कपूर आणि गोविंदा यांच्यासोबत 'दीवाना मस्ताना' या कॉमेडी सिनेमात एकत्र काम केलं आहे. यामध्ये दबंग खानचा छोटा कॅमियो होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.