अनिरुद्ध संकपाळ
PV Sindhu : बॅडमिंटनमध्ये 7 वे रँकिंगवर असणारी सिंधू महिला एकेरी आणि मिश्र दुहेरीत खेळणार आहे. आलिम्पिक 2, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 3, राष्ट्रकुलमध्ये 3 तर आशियाई गेम्स 2 पदके जिंकली आहेत.
Mirabai Chanu : वेटलिफिटिंगमध्ये मीराबाई चानू 49 वजनीगटात आपली दावेदारी सादर करणार आहे. तिने क्लीन अँड जर्कमध्ये 119 किलो वजन उचलून वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. तिने ऑलिम्पिकमध्ये रौप्य, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण, आशियाई स्पर्धेत कांस्य आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले आहे.
Bajrang Punia : 65 किलो वजनीगटात फ्रीस्टाईल कुस्तीपटू बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि कांस्य पदक, आशियाई गेम्समध्ये सुवर्ण आणि रौप्य तर राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले आहे.
Manika Batra : टेबल टेनिसमध्ये भारताला मनेका बात्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ती एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी आणि सांघिक प्रकारात खेळते. तिने आशियाई स्पर्धेत कांस्य, राष्ट्रकुल स्पर्धेत 2 सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक पटकावले आहे.
Lovlina Borgohain : बॉक्सर लोव्हलिना बोरगोहैन 69 किलो वजनी गटात आपली दावेदारी सादर करेल. लोव्हलिनाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले होते. तर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य आणि आशियाई स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. तिच्याकडून राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले वहिले पदक जिंकण्याची अपेक्षा क्रीडा चाहते करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.