वास्तूशास्रानुसार घरात चपला कुठे ठेवाव्यात? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

घरात चपला कुठे आणि कशा ठेवाव्यात याबद्दल वास्तूशास्त्रात काही नियम सांगितले आहेत.

शनिचा पायाशी थेट संबंध असतो. जर तुम्ही चपला किंवा शूजशी संबंधित काही नियमांचं पालन केलं नाही, तर शनिच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो.

वास्तूशास्त्रानुसार चपला व्यवस्थित न ठेवल्यास घरात नकारात्मकता येते.

त्यामुळे चपला किंवा शूज नेहमी व्यवस्थित ठेवायला हवेत.

ज्या चपला आपण नियमित वापरतो, त्या पश्चिम दिशेला व्यवस्थित ठेवायला हव्यात.

घरात जुनी किंवा फाटकी पादत्राणे असल्यास मानसिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

चपलांचा रॅक कधीही देवघर किंवा किचनच्या भींतीशी लागून असू नये.

याशिवाय घराच्या उत्तर, पूर्व दिशा किंवा आग्नेय आणि ईशान्येला पादत्राणांचा रॅक कधीही ठेवू नये.

घरात बेडखाली चप्पल ठेवल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.