Tourist : स्वस्त अन् परवडणाऱ्या ट्रिप्स, 'या' शहारांत घ्या पर्यटनाचा आनंद

सकाळ डिजिटल टीम

गोवा

गोव्यात पर्यटनासाठी जाणार असाल तर येथे काही हॉटेल्स परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. येथे फिरण्यासाठी समुद्रकिनारे, रेस्टॉरंट्स आणि चर्च आहेत. तुम्ही कुटुंब किंवा मित्रमंडळींसोबत गोव्याला भेट देऊ शकता. तसेच गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर बसून शांततेचे आणि विश्रांतीचे क्षण अनभवू शकता.

पॉंडिचेरी

येथे तुम्हाला अनेक ठिकाणी फ्रान्सची झलक पाहायला मिळेल. पूर्वेकडील फ्रेंच रिव्हिएरा म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते. येथे पर्यटनासाठी जाणार असाल तर तुम्हाला निसर्गसौंदर्य, खाद्यपदार्थ, स्वच्छ समुद्रकिनारे, फ्रेंच वास्तुकला, संस्कृती पहायला मिळतील. येथे गेल्यानंतर तुम्ही ऑरोविल आश्रमात कमी खर्चात राहू शकता.

वाराणसी

वाराणसी येथे तुम्ही एक किंवा दोन दिवस राहायचा प्लॅन करत असाल तर 500 ते 800 रुपये खर्च करावे लागतील. तसेच येथे खाण्यासाठी उत्तम रेस्टॉरंटही उपलब्ध आहेत. अनेक छोटे ढाबेही आहेत जिथे तुम्ही पोटभर खाण्याचा आनंद घेऊ शकता. तसेच या परिसरातील पवित्र मंदिरांचा आनंद घेऊ शकता.

अमृतसर

अमृतसर सुवर्ण मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर देशभक्तीची भावना अनुभवायची असेल तर अमृतसरला भेट देऊ शकता. येथे सुवर्ण मंदिरात तुम्ही मोफत लंगरचा आस्वादही घेऊ शकता. शहरातील कोणत्याही हॉटेल किंवा ढाब्यावर अशी चव मिळणे अशक्य आहे. अमृतसरमध्ये तुम्ही कमी बजेटमध्ये अनेक गोष्टी करु शकता.

ऋषिकेश

ऋषिकेश हे उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आहे. येथील लक्ष्मण झुला, त्रिवेणी घाट, वशिष्ठ गुहा, महादेव मंदिर ही ठिकाण अतिशय पवित्र मानली जातात. लक्ष्मण झुलाची कथा लोकांना आकर्षित करते. येथे पर्यटनासाठी प्लॅन करत असाल तर तुम्हाल अनेक उत्तम हॉटेल्स पहायला मिळू शकतात.

गोकर्ण

कारवारच्या काठावर वसलेले, गोकर्ण हे कर्नाटकातील एक लहान शहर आहे. जे समुद्रकिनारे आणि प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते. गोकर्णतील पर्यटन स्थळे मर्यादित असली तरी, तुम्हाला सुट्टीचा पुरेपूर आनंद घेता येतो. समुद्रकिनाऱ्यावर मजा करायची असेल तर तुम्ही गोकर्णला भेट दिली पाहिजे.

दार्जिलिंग

हिल्सची राणी म्हणून दार्जिलिंगला ओळखले जाते. येथे वर्षभर पर्यटक येत राहतात. या सुंदर ठिकाणी भेट देताना पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. परंतु सर्व ठिकाणे मर्यादित वेळेत कव्हर करणे शक्य नाही. दार्जिलिंगमधील टॉप पाच ठिकाणे आहेत. ज्याठिकाणी तुम्ही फॅमिलीसोबत किंवा जोडीदारासोबत जाऊ वेळ घालवू शकता.

कोडाईकनाल

तामिळनाडूचे कोडाईकनाल हिल स्टेशन 7200 फूट उंचीवर आहे. या परिसरातील निसर्गसौंदर्य आणि उत्तम पण कमी दरात मिळणारे स्वादिष्ट खाद्यपदार्थ या ठिकाणाला आणखी खास बनवतात. तुम्ही इथल्या हॉटेल्समध्ये अगदी स्वस्त दरात राहू शकता. त्यामुळे साहसी खेळांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आवर्जुन भेट देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.