प्रणाली मोरे
अमृता राव(Amrita Rao) बॉलीवूडमधील सोज्वळ,सालस,साधी-सरळ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अमृता रावचा जन्म ७ जून,१९८१ मध्ये मुबंईत झाला आहे. आज अमृता आपला ४१ वा वाढदिवस साजरा करीत आहे.
अमृता रावने हिंदी सिनेमातून विविध भूमिका साकारल्या आहेत. हिंदी,इंग्रजी,मराठी,कोंकणी अशा विविध भाषा अमृताला अवगत आहे. 'ठाकरे' सिनेमात तिनं मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारली होती. तेव्हा तिचं खूप कौतूक करण्यात आलं होतं.
अमृतानं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात २००२ साली 'अब के बरस' सिनेमातून केली. २००३ मध्ये तिला 'ईश्क विश्क' या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
अमृतानं 'मस्ती','मैं हूं ना','दीवार','प्यारे मोहन','विवाह','हे बेबी','जॉली एलएलबी','सिंग साब द ग्रेट','सत्याग्रह' आणि 'ठाकरे' सारख्या सिनेमातून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.अमृता रावला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. एक आयफा आणि दोन स्टारडस्ट अॅवॉर्ड तिनं पटकावले आहेत.
अमृतानं २००७ मध्ये तेलुगु अॅक्शन-रोमॅंटिक सिनेमा 'अथिधि' मध्ये मुख्य भूमिका केली आहे. २००९ मध्ये तिनं 'परफेक्ट ब्राइड' या रिअॅलिटी शो मध्ये परिक्षकाची भूमिका बजावली होती. २०१६ मध्ये छोट्या पडद्यावर 'मेरी आवाज सुनो' या मालिकेतून तिनं पदार्पण केलं होतं.
अमृता सध्या बॉलीवूडपासून लांब पती आरजे अनमोल आणि आपल्या लहान मुलासोबत फॅमिली लाईफ एन्जॉय करीत आहे. सिनेमात काम करायचं नाही असं तिनं म्हटलेलं नसलं तरी सध्या मात्र बॉलीवूडपासून तिनं स्वतःला दूर ठेवलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.