सकाळ वृत्तसेवा
काय तुम्ही पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केलंय का? सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यापासून ते बॅंक ट्रॅंझॅक्शनसाठी पॅनकार्ड जरुरी आहे. तर जाणून घ्या पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची सोपी पद्धत.
पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी आयकर ई-फायलिंग वेबसाईट (incometaxindiaefiling.gov.in) वर जा.
साईटवर डाव्या बाजूला तुम्हाला आधार लिंक करण्यासाठीचा पर्याय दिला आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. त्यातील detials भरा.
त्यात आपला पॅन व आधार क्रमांक नोंदवा. सर्व detials भरल्यानंतर कॅप्चा कोड भरा. एकदा तुम्ही त्याला क्लिक केलात की तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक होईल. त्याची माहिती तुम्ही स्क्रीनवरही पाहू शकता.
तुम्ही 567678 किंवा 56161 क्रमांकावर एसएमएस पाठवूनही पॅन आधारशी लिंक करू शकता. यासाठी UIDPAN (स्पेस) व (बाराअंकी आधार क्रमांक) (स्पेस) (10 अंक) टाईप करून एसएमएस पाठवा.
उदाहरणार्थ, UIDPAN 045136978525 DGIPL4612G 567678 किंवा 56161 क्रमांकावर एसएमएस पाठवा. यानंतर पॅन आधारशी लिंक होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.