रिकाम्या पोटी चहा पिताय? जाणून घ्या साइड- इफेक्ट्स

अर्चना बनगे

काही लोकांना अंथरूनातच चहा प्यायला आवडत असतो. बेड टी जर नाही मिळाली तर बैचेनी होते. मात्र रिकाम्या पोटी चहा घेणे हे आरोग्याला घातक असते.

साइड- इफेक्ट्स

रिकाम्या पोटी चहा पिल्याने नेमके कोणते साइड- इफेक्ट्स होतात हे जाणून घेऊया..

आयुर्वेदानुसार रिकाम्या पोटी चहा पिल्याने पित्ताचा त्रास होतो. ज्यामुळे अस्थिरपणा, भिती वाटायला लागते.

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिल्याने शरीरातील अंर्तगत भागावर डायरेक्ट परिणाम होतो. यामुळे अल्सरची समस्य़ा उद्भवू शकते.

वजन वाढते

सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी चहा पिल्याने पोटात साखर जाते. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते.

अॅसिडिटी :

रिकाम्या पोटी चहा पिल्याने गॅस, अॅसिडिटी, अपचन,जळजळ या सम्यसेला तोंड द्यावे लागते.

बेड टी पिल्याने शरीरात वात दोष वाढतो. ज्यामुळे हाडे कमजोर होतात. याचा परीणाम लहान वयातच पायाचे दुखणे सुरु होते.

ताण वाढतो

चहा आणि काॅफीत कॅफेनचे प्रमाण जादा असते. यामुळे शरीर अॅक्टीव्ह होते मात्र, चिडचिडपणा, राग आणि ताण-तणाव वाढतो.

हि माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bed Tea Side-Effects | Esakal