अभिनेत्री Mani Bhattacharya नं 4 वेळा मिळवला 'राष्ट्रीय पुरस्कार'

सकाळ डिजिटल टीम

मणी भट्टाचार्य (Mani Bhattacharya) हे प्रामुख्यानं भोजपुरी सिनेमातील (Bhojpuri Cinema) अभिनयासाठी ओळखलं जाणार नाव! मणीनं 2018 मध्ये भोजपुरी सुपरस्टार खेसारीलाल यादवसोबत (Khesari Lal) 'जिल्हा चंपारण' या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केलीय. तिनं फार कमी वेळात आपला ठसा उमटवलाय.

अभिनेत्री मणी भट्टाचार्य ही सोशल मीडियावर (Social Media) खूपच सक्रिय असते. पडद्यावर मणीचा लूक वेगळा असला, तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आहे.

मणीनं भोजपुरीपूर्वी बंगाली सिनेमात आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलंय. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. ती आरशासमोर साडी नेसून संवाद बोलायची.

या अभिनेत्रीला एक-दोन नव्हे, तर तब्बल चार बंगाली चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारानं (National Award) सन्मानित करण्यात आलंय. या सर्व चित्रपटांचं दिग्दर्शन संजीत रॉय यांनी केलंय. बांगला फिल्म अॅवॉर्डमध्ये (Bangla Film Award) तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळालाय.

चित्रपटांव्यतिरिक्त मणीनं मालिकांमध्येही काम केलंय. तिनं छोट्या पडद्यावर ‘फागुन लागेछे बोने बोने’ या मालिकेतून पदार्पण केलं. यानंतर तिनं अग्निपरीक्षा, मोहन बागान, सौभाग्यवती भव मेरे बांगला यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mani Bhattacharya