उत्सुकता NTR, रामचरण, अजय देवगण अन्‌ आलियाच्या बिग बजेट 'RRR'ची

श्रीनिवास दुध्याल

बिग बजेट, मल्टि स्टारकास्ट असलेला 'आरआरआर' (RRR) चित्रपट कधी रिलीज होणार, याबाबत बॉलिवूड, टॉलिवूडच नव्हे तर जपान, चायनीज व टर्कीतील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

RRR | Sakal

RRR हा एस. एस. राजामौली दिग्दर्शित आणि DVV एंटरटेनमेंट्‌सच्या D.V.V. दानय्या निर्मित तेलुगु ऍक्‍शन ड्रामा चित्रपट असून, तो कन्नड, तमिळ, हिंदी, जपान व चिनी आदी 12 भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

RRR | Sakal

या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर (Junior NTR), रामचरण (Ramcharan), अजय देवगण (Ajay Devgan), आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या मुख्य भूमिकेसह ऑलिव्हिया मॉरिस, समुथिरकानी, एलिसन डूडी, रे स्टीव्हन्सन आणि श्रिया सरन (Shiya Saran) यांनी सहाय्यक भूमिका केल्या आहेत.

RRR | Sakal

अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (एनटीआर) या दोन भारतीय क्रांतिकारकांची ही काल्पनिक कथा आहे, जे अनुक्रमे हैदराबादच्या ब्रिटिश राज आणि निजामाविरुद्ध लढले. 'आरआरआर'चा अर्थ रुद्रम, रणम व रुधीरम आहे, ज्याचा प्रत्यय या ऐतिहासिक कथानकातून येणार आहे.

RRR | Sakal

राजमौली यांनी अल्लुरी सीताराम राजू आणि भीम यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दलच्या कथा वाचल्या आणि त्यांच्यातील योगायोग जोडला. या चित्रपटातील दमदार कलाकारांची जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरलेले आहेत.

RRR | Sakal

मार्च 2018 मध्ये या चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात आली आणि नोव्हेंबर 2018 मध्ये हैदराबादमध्ये चित्रपटाच्या छायाचित्रणास सुरुवात झाली.

RRR | Sakal

400 कोटी बजेटमध्ये तयार झालेला RRR सुरुवातीला 30 जुलै 2020 रोजी रिलीज होणार होता, मात्र निर्मिती विलंबामुळे आणि त्यानंतर कोविड-19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आला.

RRR | Sakal

नंतर हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार होता परंतु अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे एनटीआर, रामचरण, अजय देवगण व आलिया भट्ट यांच्या चाहत्यांची निराशा झाली.

RRR | Sakal

याबाबत दिग्दर्शक राजमौली म्हणाले, आमच्या अथक प्रयत्नांनंतरही काही परिस्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. कोविडमुळे भारतातील अनेक राज्ये चित्रपटगृहे बंद करत असल्याने, तुम्हाला तुमचा उत्साह टिकवून ठेवण्यास सांगण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RRR | Sakal