अनुराग कश्यपची मुलगी एका महिन्यात किती खर्च करते?

Balkrishna Madhale

बॉलिवूड चित्रपट निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया तिचे मजेदार व्हिडिओ शेअर करून तिच्या 'ग्लॅमरस' आयुष्याची झलक दाखवत असते. काल नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी आलियानं तिच्या यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात ती चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे.

एका चाहत्यानं आलियाला एक मजेदार प्रश्न विचारला, की ती एका महिन्यात किती खर्च करते? यावर उत्तर देताना आलिया म्हणाली, मी काय करावं अशी यापेक्षा आहे?

आलियानं सांगितलं, की तिचा बहुतेक खर्च कपडे आणि खाण्यावर होत असतो. मी दर 2 आठवड्यातून एकदा ऑनलाइन शॉपिंग करते. तर आठवड्यातून किमान 3-4 वेळा ऑर्डर करत असते. मला माहितीय, हे चांगलं नाही.

या व्हिडिओत आलियानं प्लॅन्स, बॉयफ्रेंडसोबतच्या नात्याबद्दलही बरंच काही सांगितलं. तिनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत सुंदर नातं कसं जपलं, हे देखील सांगितलंय. आलिया तिच्या बॉयफ्रेंडसोबत आज नवीन वर्ष साजरं करणार आहे.

आलियानं तिच्या नवीन वर्षाच्या संकल्पाबद्दलही सांगितलंय. तिनं स्वतःला वचनबध्द केलंय की, ती वर्कआउट्स आणि फिटनेसमध्ये कायम सातत्य ठेवेल.

आलियाला नवीन वर्षात निरोगी जीवनशैली जगायची आहे. आलिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय असते.

आलिया तिच्या चॅनलवर माहितीपूर्ण व्हिडिओही बनवते. रिलेशनशिप, मानसिक समस्या, ट्रोलिंग यांसारख्या गंभीर विषयांवरही बोलायला ती कमी पडत नाही. आलियाची पर्सनल लाइफ खूपच बोलकी आहे.

आलिया कश्यप ही चित्रपट निर्माता अनुराग कश्यप आणि त्यांची पहिली पत्नी आरती बजाज यांची मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaliyah Kashyap