श्रीनिवास दुध्याल
तुम्हाला माहीत का, की तापसी पन्नूने चित्रपटांमध्ये करिअर करण्यापूर्वी सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून काम केले.
मॉडेलिंग करताना तापसी जाहिरातींमध्येही झळकली. तिने 2008 मध्ये पॅंटालून्स फेमिना मिस फ्रेश फेस आणि सेफी फेमिना मिस ब्यूटीफुल स्किन पुरस्कार पटकावला.
मॉडेलिंगमध्ये काही काळ काम केल्यानंतर तापसीने राघवेंद्र राव दिग्दर्शित 2010 च्या तेलुगु चित्रपट 'झुम्मंडी नादम'मधून अभिनयाची सुरुवात केली.
यानंतर तापसीने 'चश्मेबद्दूर' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
तिच्या 'बेबी', "पिंक' आणि 'नाम शबाना' आदी चित्रपटांतील भूमिकांना प्रेक्षकांची मोठी प्रशंसा मिळाली.
अक्षय कुमारसोबतचा चित्रपट 'बेबी'मध्ये तापसीचा अॅक्शनपटही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला.
तापसीने तेलुगु चित्रपटातून करिअरला प्रारंभ केला असला तरी तिचे मल्याळम, तमिळ व हिंदी चित्रपटांमधीलही यशस्वी कारकीर्द दिसून येते.
तापसीने आव्हात्मक व ऍक्शनपटासह कॉमेडी, चरित्रात्मक भूमिकाही केल्या अन् तिच्या अभिनयाची प्रशंसा केली गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.