सकाळ डिजिटल टीम
भारतीय बाजारपेठेत स्कूटरला खूप मागणी आहे तुम्हाला बाजारात स्कूटरचे अनेक दमदार ऑप्शन्स मिळतील, यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर्सचा देखील समावेश आहे. आज आपण असेच काही ऑप्शन्स पाहाणार आहोत.
टीव्हीएस ज्युपिटर मध्ये तुम्हाला १०९.७सीसी इंजिन मिळते जे ७.८८ पीएस पावर आणि ८.८ एनएम टॉर्क जनरेट करते याची किंमत ६६,९९८ ते ७७,७७३ रुपये इतकी आहे.
होंडा डिओ या स्कूटरमध्ये ११० सीसी इंजिन आहे जे ७.६५ एचपी पावर आणि ९ एनएम टॉर्क जनरेट करते, याची किंमत ६८,७५६ रुपयांपासून सुरू होते.
टीव्हीएस स्कूटी झेस्ट यामध्ये १०९.७ सीसी इंजिन आहे जे ७.८१ पिएस पावर आणि ८.८ एनएम टॉर्क जनरेच करते, याची किंमत ६५,४१६ ते ६७,०९३ इतकी आहे
ओला एस १ या स्कुटरची खिंमत ९९,९९९ रुपयांपासून सुरू होते. तर ही स्कूरट एका चार्जमध्ये १२१ किमी चालते आणि हिचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे.
ओकिनावा ipraise ही स्कूटर एका चार्जमध्ये १७० किमी पर्यंत चालते,याची किंमत १.१५ लाख रुपये इतकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.