स्किन टोननुसार वापरा स्क्रब ; जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

सकाळ डिजिटल टीम

बऱ्याचदा स्किन ड्राय झाल्यानंतर स्क्रबचा वापर केला जातो. काही मुली तर नियमित याचा वापर करतात.

स्क्रबचा वापर करत असताना तो स्किन टोननुसार वापरला पाहिजे.

आज तुम्हाला कोणत्या स्किनला कोणता स्क्रब वापरावा या टिप्स देणार आहोत.

तुमची स्किन जर आॅयली असेल तर तुम्ही दुधी भोपळा (Calabash) किसून लावू शकता. हा लेप १० मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर माॅइश्चराइजर लावा.

काॅफीत दही आणि मध मिक्स करून लावा. याला चेहऱ्याला ५ मिनिट लावा. आणि धुऊन टाका.

मसुर डाळीच्या (Masoor Dal) पावडरीत हळद आणि दही मिक्स करून १५ मिनिटे लावा.

ड्राय स्किनच्या फेशवाॅशमध्ये (Facewash) साखर मिसळून १० मिनिटे लावा. स्वच्छ धुतल्यानंतर माॅइश्चराइजर लावा.

तुमची स्किन जर जादा कोरडी असेल तर लिंबूचे पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावा.

नाॅर्मल स्किनवर दूध, हळद आणि गुलाबजल मिक्स करून १० मिनिटे लावा. नंतर कोमट पाण्याने धुऊन घ्या.

दूधामध्ये गाजर,संत्र्याचा रस मिक्सकरुन लावा. अर्धा तासाने धुऊन घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

scrub choose tips | ESakal