भक्ती सोमण-गोखले
आपले शरीर हेल्दी ठेवायचे असेल तर आहारात विविध पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. हृदय निरोगी ठेवायचे असेल तर व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थ खाणे गरेजेच आहे. त्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करावा.
सालमन फिशमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन डी असते, तसेच ऑमेगा फॅटी अॅसिड आणि व्हिटेमिन बी-१२ ही त्यातून मिळते. सॅल्मन जळजळ कमी करते, हृदयाच्या आरोग्य राखण्यास मदत करते.
सोयाबीनपासून बनविलेले टोफू हे जीवनसत्त्वे आणि प्रथिनेंनी परिपूर्ण आहे. व्हिटॅमिन डी व्यतिरिक्त, टोफूमध्ये भरपूर लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते.
संत्र्याच्या रसात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी असते. त्याच्या सेवनाने आरोग्य सुधारण्यास मदत होते.
अंड्यातील पिवळ्या बलकात प्रथिने आणि कर्बोदकांसह सर्व आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे प्रमाणात अंड्याचा पिवळा बलक खाणे गरजेचे आहे.
दही व्हिटॅमिन डीने समृद्ध आहे. पण ते घरीच तयार केले असेल तर त्याचे फायदे जास्त मिळतात.
स्विस चीज खाल्ल्याने कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के सोबत व्हिटॅमिन डी मिळते. यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. स्विस चीज तुकडे सॅलेडमध्ये चांगले लागतात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.