नमिता धुरी
तुम्ही खेळाडू नसाल तरीही केवळ ज्ञानाच्या बळावर तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता.
स्पोर्ट्स फोटोग्राफर
खेळांच्या सामन्यांचे आयोजन आणि त्यानंतरच्या क्षणांची छायाचित्रे टीपण्याचे काम स्पोर्ट्स फोटोग्राफर करतो. या क्षेत्रात फ्रीलान्सर म्हणूनही काम करता येते.
स्पोर्ट्स जर्नलिस्ट
खेळांच्या सामन्यांचे समादेशन करणे किंवा त्याबद्दल लिहिणे आवडत असल्यास तुम्ही स्पोर्ट्स रिपोर्टर किंवा अँकर बनू शकता.
स्पोर्ट्स मॅनेजमेंट
सामन्यांचे आयोजन करण्यासाठी स्पोर्ट मॅनेजर आवश्यक असतो.
फिटनेस एक्स्पर्ट
काही खेळाडूंना शारीरिक आरोग्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शक आवश्यक असतो. अशावेळी तुम्ही फिटनेस एक्स्पर्ट म्हणून काम करू शकता.
कमेंटेटर
क्रीडा सामन्यांदरम्यान समादेशन म्हणजेच कॉमेंट्री करण्याचे कौशल्य तुम्हाला अवगत असेल तर या क्षेत्रातही करिअर करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.