लांबलचक केसांसाठी असा करा लसणीचा उपयोग

नमिता धुरी

केसांना नैसर्गिकरित्या मिळणारे पोषण कमी झाले की केस निर्जीव दिसू लागतात. अशावेळी लसूण हा उत्तम उपाय ठरू शकतो.

लसणीत बी ६ आणि क जीवनसत्त्व, मँगनीज, सेलेनियम अशी पोषक तत्त्वे असतात. यामुळे केस सुदृढ राहतात. लसणीचं तेल किंवा लसणीची पेस्ट नियमितपणे केसांना लावल्यास केसांची लांबी वाढू शकते.

सूर्याच्या अतिनील किरणांमुळे केसांचे नैसर्गिक केराटिन, प्रोटीन नष्ट होते. केसांना लसूण लावल्याने ही समस्या टाळता येते.

लसूण बारीक कापून त्याची पेस्ट करून घ्या. मग एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घाला. गरम झाल्यावर त्यात लसूण पेस्ट घालून ढवळा.

तेल थंड करून त्यातला चोथा काढून टाका आणि तेल एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

केसांच्या मुळांशी हे तेल लावून १५ मिनिटे मालिश करा. त्यानंतर शॅम्पूने केस धुवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.