सकाळ डिजिटल टीम
तुम्ही नोकरदार असाल आणि तुमचा पीएफ कट होत असेल तर तुम्हाला किती रक्कम जमा आहे पाहायचे असेल तर त्यासाठी अनेक मार्ग आहेत. चला जाणून घेऊयात
तुम्ही एसएमएस पाठवून देखील PF बॅलेन्स तपासू शकता, पण त्यासाठी ईपीएफओमध्ये तुमचा यूएएन क्रमांक रजिस्टर असावा लागतो
इतकेच नाही तर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.
SMS नंतर तुम्ही मिस्ड कॉल करुनही तुमचे पीएफ बॅलेन्स तपासू शकता, पण यासाठी तुमचा फोननंबर पीएफ खात्याशी लिंग असावा लागेल.
तुम्हाला फीएफ खात्याशी लिंक असलेल्या नंबरवरुन 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला मेसेज येईल ज्यामध्ये पीएफ बॅलेन्स सांगितले जाईल.
तुम्ही उमंग App वापरुन देखील पीएफ बॅलेन्स तपासू शकता, यासाठी तुमचा फोन नंबर रजिस्टर करा आणि App वर लॉग इन करा.
तुम्ही ईपीएफओच्या वेबसाइटवर लॉग इन करुन देखील पीएफ बॅलेन्स तपासू शकता, यासाठी तुम्हाला UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा भरावा लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.