पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी? ट्राय करा या सोप्या टीप्स

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात केसगळती किंवा कोंड्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं त्यामुळे केसांची काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसात भिजल्यावर केस ओले राहू देऊ नका. त्यामुळे केसात कोंडा किंवा फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात केमिकल फ्री शँम्पू वापरा त्यामुळे केसगळती सारख्या समस्या उद्भवणार नाही.

हेअर शायनिंगसाठी केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरणे टाळा. त्यामुळे केसगळती सुरू होणार.

पावसाळ्यात केसांना विंचरायला जाड दातांचा किंवा लाकडी कंगवा वापरा, त्यामुळे केस तुटण्याची समस्या कमी असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.