नमिता धुरी
गरोदरपणात बाळाचा आकार वाढत जातो तसतसे आईच्या पोटाची त्वचा ताणत जाते. त्यामुळे स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. बाळंतपणानंतरही हे स्ट्रेच मार्क्स जात नाहीत. त्यावर काही घरगुती उपाय करता येतील.
कोरफडच्या गराने स्ट्रेच मार्क्सवर मालिश करा. याचा परिणाम काही दिवसांतच दिसू लागेल.
एका कापडावर मध घेऊन ते स्ट्रेच मार्क्सवर लावा. ते सुकले की त्वचा गरम पाण्याने धुवा.
बटाट्यामध्ये पॉलिफेनॉल आणि फायटोकेमिकल्स असतात. बटाट्याने स्ट्रेच मार्क्सवर मालिश करा.
लिंबूच्या रसात बेकींग सोडा घालून तो स्ट्रेच मार्क्सवर चोळा. यामुळे स्ट्रेच मार्क्स निघून जातील.
हळद आणि चंदन समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण स्ट्रेच मार्क्सवर लावा. सुकल्यावर धुवा.
नारळाच्या तेलाने स्ट्रेच मार्क्सवर मालिश करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.