हे पदार्थ दुधात मिसळून मुलांना दिलेत तर मिळतील आरोग्यदायी फायदे

नमिता धुरी

खजुरामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम, बी १६ जीवनसत्त्व, कॉपर, इत्यादी पोषक घटक असतात. यामुळे पचन चांगले होते व हाडे मजबूत होतात.

बदाम हे एक झिरो ग्लायसेमिक फूड आहे. दुधासोबत बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते व बुद्धीही विकसित होते.

हळदीमध्ये अॅण्टीबॅक्टेरियल आणि अॅण्टिव्हायरल गुण असतात. त्यामुळे ऋतुनुसार उद्भवणाऱ्या आजारांपासून मुलांना संरक्षण मिळते.

डार्क चॉकलेटमध्ये अॅण्टिऑक्सिडंट असतात. त्यामुळे दूध आरोग्यदायी आणि चविष्ट बनते.

केशर दुधात मिसळून खाल्ल्याने हाडे मजबूत होतात व पोटाचे विकार होत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.