स्वतःचे इन्स्टा अकाऊंट असणाऱ्या राहुलचा 'चाऊ चाऊ' डॉगची किंमत आहे लाखाच्या घरात

सुस्मिता वडतिले

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचं (Sachin Tendulkar)आपल्या श्वानावर असलेलं प्रेमही कुणापासून लपून राहिलेलं नाही. सचिन तेंडुलकर अनेकदा आपल्या पॅट डॉग 'स्पाइक'सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. सचिन तेंडुलकरने एकदा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने आपल्या पॅट डॉग 'स्पाइक'ची ओळख आपल्या चाहत्यांना करून दिली होती.

Sachin Tendulkar

टीम इंडियाचा स्टार ओपनर लोकेश राहुलही (Lokesh Rahul)श्वानप्रेमी असून, त्याच्याकडे असलेल्या श्वानाचं नाव सिम्बा असं आहे. सिम्बाच्या नावावर स्वतंत्र इन्स्टाग्राम अकाऊंट आहे, यावरून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही लावू शकता. सिम्बाची किंमत 1,25,000 ते 1,75,000 रुपयांच्या आसपास आहे.

Lokesh Rahul

विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma)यांना श्वानांबद्दल खूप प्रेम आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अनेकदा आपल्या श्वानसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. विराट आणि अनुष्काचा मुंबईत एक पॅट डॉग आहे. त्याचं नाव 'Dude' आहे.

Virat Kohli

भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni)हा श्वानप्रेमी आहे. रांचीतील त्यांच्या फार्म हाऊसमध्ये अनेक श्वान आहेत. धोनी हा पॅट डॉग्ससोबत मस्ती करताना पत्नी साक्षी अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. एमएस धोनीकडे एक जर्मन शेफर्ड आणि अनेक जातीचे श्वान आहेत.

Mahendra Singh Dhoni

भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याही (Hardik Pandya) मोठा श्वानप्रेमी आहे. हार्दिकच्या घरात अनेक श्वान आहेत. हार्दिक नेहमीच इन्स्टाग्रामवर आपल्या श्वानासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya