सुस्मिता वडतिले
मिस युनिव्हर्स 2021' या अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) बाजी मारली आहे.
इस्रायलमध्ये ही सौंदर्यस्पर्धा पार पडली. अभिनेत्री लारा दत्ताने (Lara Dutta)2000 मध्ये हा किताब पटकावला होता.
त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी हरनाजने (Harnaaz) 'मिस युनिव्हर्स'चा (Miss Universe) मुकूट (Crown) भारतात (India) आणला.
हरनाजने पॅराग्वे (Paraguay) आणि दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) स्पर्धकांना मागे टाकत 'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकला.
मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स 2020 अँड्रिया मेझा हिने हरनाजला आपला मुकूट दिला.
या सौंदर्यस्पर्धेत पॅराग्वे (Paraguay) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विजयी ठरले.
"आजच्या काळात येणाऱ्या तणावांना कसं सामोरं जावं याविषयी तुम्ही तरुण महिलांना काय सल्ला द्याल", असा प्रश्न टॉप ३ राऊंडमध्ये विचारण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.