चला ट्रेकींगला...भारतातील या ठिकाणी आयुष्यात एकदा तरी भेट द्या!

भक्ती सोमण-गोखले

आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिन. भारतातली हिमशिखरे कायम ट्रेकर्सना साद घालत असतात. या हिवाळ्यात अशा ठिकाणी जायला मिळण्याचा आनंद वेगळाच असतो. तुम्हाला बर्फात खेळणे, निसर्गाच्या विविध छटांचा, आव्हानांचा सामना करणे आवडत असेल तर हिवाळ्यात या ठिकाणांना नक्की भेट द्या.

हम्प्ता पास ट्रेक, हिमालच प्रदेश (Hampta Pass Trek) - कुलु खोऱ्यातील हम्प्ता गावापासून सुरू होणारा हा ट्रेक लाहौल आणि सिप्ती व्हॅलीतील चत्रू येथे संपतो. हा ट्रेक सुमारे 35 किमीचा आहे. हा कालावधी सुमारे 4 ते 5 दिवसांचा आहे, ज्यामध्ये सर्वोच्च उंची 4400 मीटर आहे.

डोडिताल ट्रेक (Dodital Trek) -उत्तरकाशी जिल्ह्यात वसलेले डोडीताल हा लहना तलवा आहे, समुद्रसपाटीपासून 3000 मीटर उंचीवर वसलेला आहे. हा ट्रेक करताना तुम्हाला निसर्गाची मुक्त उधळण पाहायला मिळतो. तसेच ओक आणि रोडोडेंड्रॉनची झाडे येथील आकर्षण आहे.

बियास कुंड ट्रेक(Beas Kund Trek)- हिमाचल प्रदेशमधील सर्वात आव्हानात्मक ट्रेकपैकी एक म्हणून ही जागा ओळखली जाते. मनालीमधील हा सर्वात लोकप्रिय लॉंग विकेंड ट्रेक आहे. हे ट्रेक करण्यासाठी तुम्हाला ट्रेकिंगचा पुर्वानूभव असण्याची गरज नाही, हे ठिकाण महाभारताचे लेखक व्यास ऋषी यांचे आंघोळीचे ठिकाण होते, असे म्हणतात.

व्हॅली ऑफ फ्लॉवर ट्रेक (Valley of Flowers Trek) - उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे, तसेच ही जागा तुम्हाला हेमकुंड साहिबच्या तिर्थक्षेत्राकडे घेऊन जाते. या ट्रेकचे अंतर ५५ किमी असून उंची ३६५८ मीटर आहे.

रूपिन पास ट्रेक, गढवाल (Rupin Pass Trek) गढवला प्रदेशातील रूपिन पास ट्रेक हा आव्हानात्मक ट्रेक ७ दिवसांचा आहे. ज्याची उंची १५२० फूट आहे. ५२ किमीचा हा ट्रेक असून तो उत्तराखंडमधील धौला येथून सुरू होऊन हिमालच प्रदेशातील सांगला येथे संपतो.

बराडसर लेक ट्रेक, गढवाल (Baraadsar Lake Trek) - गढवाल प्रदेशामधील अप्रतिम सौंदर्य पाहायचे असेल तर बरडसर तलावाचा ट्रेक करणे मस्ट आहे. हा ट्रेक साहसी पर्यटकांना खुणावतो. ट्रेक धौला येथून सुरू होतो आणि पुढे बित्री, ढलका धार आणि मसुंध धारकडे जातो. ट्रेक करताना दऱ्या पार कराव्या लागतात.

रूपकुंड ट्रेक, गढवाल(Roopkund Trek) - ज्यांना साहसी पर्यटन आवडते, त्यांच्यासाठी आव्हानात्मक आणि अतिशय आवडीचा हा ट्रेक आहे, इथली पायवाट घनदाट जंगलातू जाते. जसजसे पुढे जावे तसतसे मानवी वस्ती तसेच जंगल अस्पष्ट दिसते. फक्त कुरण दिसायला लागते.

चोकरामुडी ट्रेक, मुन्नार - मुन्नारमधील चोकरामुडी ट्रेकमध्ये चहाचे मळे, टेकड्या, उंच जंगले आणि नद्या आहेत. तसेच दाट धुके येथे असते. हा ट्रेक चोक्रमुडी पर्वताजवळ सुरू होतो. नवशिक्यांसाठी हा अतिशय उत्तम ट्रेक आहे. येथून तुम्हाला पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर अनामुडीचे निसर्गसौदर्य पाहायला मिळते.

केदारताल ट्रेक( Kedartal Trek)- केदारताल हा इतर हिमालयीन ट्रेकच्या तुलनेत अवघड ट्रेक आहे. हा मोठअया पर्वतरांगांनी वेढलेल्या ट्रेक हिमनदीच्या केदारताल सरोवरावरावरून जातो. तसेच माउंट थलयसागर, माउंट भृगुपंथ, माउंट नंदा पर्वत, माउंट जोगिन आणि माउंट गंगोत्री हे या कढईतील काही प्रसिद्ध पर्वत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.