बजरंगबलीची द्रोणागिरी गाथा; जरंडेश्वर घडविला लंकेला जाता जाता

सकाळ डिजिटल टीम

साताऱ्यापासून 20 किमी अंतरावर असलेला जरंडेश्वर डोंगर ट्रेकिंग, देवदर्शन तसेच पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.

रामायणामध्ये जखमी लक्ष्मणाला वाचवण्यासाठी श्री हनुमानाने उचलून आणलेल्या द्रोणागिरी पर्वताचा कोसळलेला भाग म्हणजे जरंडेश्वर अशी आख्यायिका आहे.

समुद्रसपाटीपासून 3000 फूट उंचीच्या जरंडेश्वर डोंगरावर स्वयंभू हनुमानाचे जागृत देवस्थान आहे.

श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.

जरंडेश्वर गड पाहण्यासाठी राज्यभरातून ट्रेकिंग ग्रुप, तसेच पर्यटक येत असतात.

जरंडेश्वरवरून आजुबाजूचा संपुर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात येतो.

सुर्योदय तसेच सुर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य पाहणे आनंददायी असते.

पहाटेच्या वेळी येथील परिसर धुक्यात हरवून जातो.

जरंडेश्वरपासून अजिंक्यतारा, चंदन-वंदन, कल्याणगड, वर्धनगड हे किल्ले अगदी जवळच्या अंतरावर आहेत.

ट्रेकिंग, निसर्ग पर्यटन तसेच देवदर्शन इत्यादीसाठी येथे एकदा तरी अवश्य भेट द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.