सकाळ डिजिटल टीम
भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती (President of India) द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी शपथ घेतलीय.
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रमुख म्हणून हे पद भारताची ताकदीचं प्रतिनिधित्व करतं. त्यामुळं त्याला साजेशी वास्तू म्हणजे हे राष्ट्रपती भवन.
या राष्ट्रपती भवनाच्या प्रशस्त खोल्या, सुंदर असे खांब आणि एकूणच थाट बघण्यासारखा नक्कीच आहे.
सर एडविन लुटियन्स आणि हार्बर्ट बेकर यांनी राष्ट्रपती भवन साकारलं. हे दोघंही ब्रिटिश राजवटीतले अत्यंत कलात्मक वास्तुविशारद म्हणून ओळखले जात.
या इमारतीच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचं तर, तिचा आकार इंग्रजी अक्षर 'H' सारखा आहे. एकूण 330 एकर क्षेत्रापैकी 5 एकरावर ही इमारत बांधण्यात आली आहे.
यात एकूण 340 खोल्या, चार मजले, 2.5 किलोमीटर लांबीचा पायवाट आणि 190 एकर बाग आहे.
ब्रिटीश राजवटीत भारताच्या व्हाईसरॉयसाठी ही इमारत बांधण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.