Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जीवन प्रवास

सकाळ डिजिटल टीम

मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीमधील ज्येष्ठ प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे.

Lata Mangeshkar

हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायिका होत्या. त्यांना 'लता दीदी' म्हणून हिंदी संगीतविश्वात ओळखले जायचे.

Lata Mangeshkar

मध्य प्रदेशच्या इंदूर (Indore) शहरात लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ झाला.

Lata Mangeshkar

लता दिदींचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता मंगेशकर या सर्वात ज्येष्ठ अपत्य.

Lata Mangeshkar

लता मंगेशकर यांनी 'पहिली मंगळागौर' या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले.

Lata Mangeshkar

२००१ साली लता मंगेशकर यांना 'भारतरत्‍न' पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला कलाकार आहेत.

Lata Mangeshkar

'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये १९७४ ते१९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी लता मंगेशकर यांचे नोंदले गेले आहे.

Lata Mangeshkar

लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.

Lata Mangeshkar

लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lata Mangeshkar