Kiran Mahanavar
ऑस्ट्रेलियाने मार्चमधील आपला दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केला. यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला ऑस्ट्रेलियाने दौरा रद्द केल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला.
आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना कोरोनाची लागण झाली.
अफगाणिस्तानात सत्ताबदल झाला आणि तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतला. तालिबानने देशात क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण करण्यास बंदी घातली. तर महिलांना खेळ खेळण्यास प्रतिबंध केला.
रमिझ राजा पीसीबीचे चेअरमन झाल्यानंतर प्रशिक्षक मिसबाह-उल-हकने पदाचा राजीनामा दिला. गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनिस याने देखील टी 20 वर्ल्डकपच्या आधी एक महिना राजीनामा दिला.
यॉर्कशायर क्रिकेट क्लबचा माजी खेळाडू अझीम रफीक याने इंग्लंडमधील प्रसिद्ध काऊंटी क्रिकेट क्लब यॉर्कशायरमध्ये वर्णद्वेश होत असल्याचा आरोप केला. या प्रकरणात मायकल वॉगनला बीबीसीच्या समालोचक पदाचा राजीनामा द्यावा लागला.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनला अॅशेस मालिकेच्या तोंडावर राजीनामा द्यावा लागला. त्याचे 2017 मधील सेक्सटिंग प्रकरण पुन्हा वर आल्याने टीम पेनने हा निर्णय घेतला.
बीसीसीआयने विराट कोहलीची एकदिवसीय कर्णधारपदावरुन केली उचलबांगडी. विराट - गांगुलींनी परस्पर विरोधी वक्तव्ये करुन संभ्रम आणि वाद निर्माण केला.
अॅशेस मालिकेत बेन स्टोक्सने तब्बल 14 वेळा ओव्हर स्टेपिंग केले. मात्र फक्त दोन वेळाच नो बॉल देण्यात आला. यातील एका चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर बाद झाला. यावेळी तांत्रिक गडबडीची सबब देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.