Monsoon : पावसाळ्यात भेट देण्यासाठी 'ही' सुंदर ठिकाणं स्वर्गापेक्षा कमी नाहीत!

सकाळ डिजिटल टीम

Monsoon Season : प्रत्येक ऋतूत अतिशय सुंदर दिसणार्‍या आपल्या देशात नैसर्गिक सौंदर्याची कमतरता नाही. मात्र, पावसाळा आला की काही ठिकाणं अशी आहेत की, ज्यांचं सौंदर्य आणखीनच वाढतं. चला तर मग आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल सांगतो, जी पावसाळ्यात आणखीनच सुंदर बनतात.

शिमला (Shimla) : हिमाचल प्रदेशच्या सुंदर मैदानी प्रदेशात वसलेलं शिमला हिल स्टेशन प्रत्येक ऋतूत खूप सुंदर दिसतं, पण पावसाळ्यात या ठिकाणचं सौंदर्य पाहून सगळेच वेडे होतात. डोंगरावरील हिरवळ, निळे आकाश आणि ढग पाहून इथं येणारे पर्यटक या ठिकाणच्या सौंदर्यात हरवून जातात.

मसुरी (Mussoorie) : पर्यटकांच्या सर्वोत्तम टेकडी स्थळांपैकी एक. मसुरी दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटकांना आकर्षित करते. मोसमात इथल्या हॉटेल्समध्ये खोल्या मिळणं कठीण होऊन बसतं यावरून इथल्या सौंदर्याचा अंदाज लावता येतो.

शिलाँग (Shillong) : पावसाळ्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांचा विचार केला तर शिलाँगचंही नाव घेतलं जातं. पावसाळ्यात हे ठिकाण भारतातील सर्वोत्तम ठिकाण मानलं जातं. धुक्याचे ढग, धबधबे शिलाँगच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात.

कुर्ग (Coorg) : पावसाळ्यात हे ठिकाण एक वेगळंच सौंदर्य पसरवतं, पावसाळ्यात हे ठिकाण पाहण्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं.

मुन्नार (Munnar) : हिरवळ, धबधबे आणि पर्वतांनी वेढलेल्या मुन्नारला वर्षभर पर्यटक भेट देतात. मात्र, पावसाळ्यात इथं भेट देणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते.

दार्जिलिंग (Darjeeling) : हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं दार्जिलिंग हे पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season Tourism