फक्कड मटण खायचंय! पुण्यातली 'ही' ठिकाणं आहेत बेस्ट

सकाळ डिजिटल टीम

विकेंड सुरू झालाय, अनेकांना नॉनव्हेज पदार्थ खायचा मोह होतो. अशावेळी पुण्यातली काही ठिकाणं आहेत तिथे तुम्ही नॉनव्हेजचा आस्वाद घेऊ शकता. यातली ठिकाणं प्रसिद्ध फूड ब्लॉगर कुणाल विजयकर यांनी सुचवली आहेत.

सुर्वेज प्युअर नॉनव्हेज हॉटेल - शिवाजीनगर जवळ असणारे हे हॉटेल मटण आवडणाऱ्या लोकांसाठी बेस्ट आहे. मटण जत्रा- यात्रा हंडी, मटण आळणी, खर्डा चिकन हे पदार्थ आवर्जून खावे असे आहेत.

जय तुळजा भवानी - पुणे-सोलापूर हायवेवर असणाऱ्या हॉटेलमध्येही मटन राण, मटन अळणी फ्राय, मसाला थाळी असे पदार्थ चांगले आहेत.

रेसिपी नॉन व्हेज रेस्टोरंट - भांडारकर रस्त्याव असलेल्या या हॉटेलात मटण खिमा, काळं चिकन, मटण अळणी हे पदार्थ प्रसिद्ध आहेत.

वी इडली वाले- बाणेरला असणाऱ्या या हॉटेलमधील चिकन पेपर फ्राय डोसे, फीश पॉलीचटू, इडली क्रॅब करी प्रसिद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.