Nagpur Crime : गुंडाची महिलांकडून हत्या ते पत्रकाराच्या आई, मुलीचा खून

नीलेश डाखोरे

राणे दाम्पत्य हत्याकांड

कौटुंबिक कलहातून पत्नी डॉ. सुषमा राणे यांनी पती धीरज आणि दोन्ही मुलांना इंजेक्शन देत ठार केले. नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली होती.

बाल्या बिनेकर हत्याकांड

उपराजधानीतील सेव्हन हिल बारमध्ये संपत्तीच्या वादात प्रॉपर्टी डीलर बाल्या बिनेकरची हत्या करण्यात आली होती.

किन्नर चमचम हत्याकांड

किन्नरांचा गुरू उत्तमबाबा सेनापतीने वर्चस्वाच्या वादातून साथीदारांच्या मदतीने चाकू, तलवारीने घाव घालत शिष्य चमचम गजभियेची हत्या केली होती.

अक्कू यादव हत्याकांड

सीरियल किलर भरत कालीचरण ऊर्फ ​​अक्कू यादवची सुमारे २०० महिलांनी न्यायालयाचा दरवाजा तोडून हत्या केली होती. हा सीरियल किलर महिलांना आपला बळी बनवायचा.

यश चांडक हत्याकांड

दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांनी कर्मचारी राजेशला नोकरीवरून काढून टाकले होते. सूड आणि पैशाच्या लालसेपोटी त्याने १ सप्टेंबर २०१४ रोजी युग चांडकची हत्या केली होती.

कुश कटरिया हत्याकांड

११ ऑक्टोबर २०११ रोजी उद्योजक प्रशांत कटारिया यांचा पाच वर्षांचा मुलगा कुशचे शेजारी राहणाऱ्या आयुष पुगलिया याने खंडणीसाठी निर्घृण हत्या केली होती.

पत्रकार कांबळेच्या आई, मुलीची हत्या

पत्रकार रविकांत कांबळे यांची चिमुकली मुलगी आणि आईची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. ही घटना २०१८ मध्ये घडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.