प्रणाली मोरे
'ट्रॅप्ड','शादी में जरुरआना','स्त्री','न्यूटन','सिटीलाइट्स','अलीगढ' सारखे हिट सिनेमे देणाऱ्या राजकुमार रावचा चाहतावर्ग मोठा आहे. पण हे यश मिळवताना राजकुमारला मात्र भरपूर कष्ट करावे लागले आहेत.
एकत्र कुटंबपद्धतीत राजकुमारचा जन्म झाला. गुरुग्राम सारख्या छोट्याशा शहरात राहूनही त्यानं अभिनयात करिअर करायचं स्वप्न पाहिलं. दिल्लीतील एका थिएटर ग्रुपला तो जॉइन झाला.
गुरुग्राम ते दिल्ली असा ७० किलोमीटरचा प्रवास राजकुमार राव सायकल वरुन पार करायचा. पण स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीनं त्याला कधी थकवलं नाही असं तो म्हणाला.
गुरुग्राम सोडून पुढे मुंबईत करिअरसाठी आल्यावर पहिली दोन वर्ष राजकुमार रावसाठी खूप खडतर होती. खिशात पैसे नव्हते पण स्वप्न मोठं पाहिलं होतं. त्यामुळे अवसान गळून चालणार नव्हतं.
राजकुमार राव एका मुलाखतीत म्हणाला आहे, ''मुंबईत आल्यावर कधी खायला देखील पैसे नसायचे. जे पाच-दहा रुपये खिशात असायचे त्यातून पार्ले-जी चा छोटासा पुडा घ्यायचा आणि त्याच्यावरच लंच झाल्याचा आनंद मानायचा,रात्रीच्या जेवणाचा थांगपत्ता नसायचा,तेव्हा या पार्लेजीनेच जगवलं''.
एकवेळ अशीही होती की माझ्या बॅंक अकाऊंटमध्ये फक्त १८ रुपये शिल्लक होते. रात्रीचं जेवण म्हणजे पाणी पिऊन झोपायचं. पण अशावेळी अनेकदा मित्रांनी आधार दिल्याचं सांगायला राजकुमार राव विसरत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.